आजपासून ST बस चा प्रवास महागला पहा किती भाडेवाढ झाली परिपत्रक जारी

st bus ticket fares increased

ग्रामीण व शहरी सेवेच्या प्रवासभाडे दरवाढ अंमलबजावणी बाबत आजपासून ST बस चा प्रवास महागला पहा किती भाडेवाढ झाली परिपत्रक जारी (maharashtra state transport corporation st bus ticket fares increased)

मुंबई: ठाणे /पालघर / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग / नाशिक / अहमदनगर /धुळे जळगांव / पुणे / सातारा | कोल्हापूर | सांगली / सोलापूर /औरंगाबाद | नांदेड / बीड | परभणी /उस्मानाबाद / लातूर / जालना /नागपूर / चंद्रपूर/ गडचिरोली / भंडारा / वर्धा / अमरावती / यवतमाळ / अकोला / बुलढाणा. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीनुसार शासनाला प्रवास भाडेदर ठरविण्याचे अधिकार आहेत. शासन निर्णय क्र.एमटीसी -१०९९/ ४५१/ प्र.क्र.२१/ परि – १ दिनांक १६.४.१९९९ अन्वये आपोआप भाडेवाढ सुत्र शासनाने मान्य केले आहे.

हे देखील वाचा »  आता UPI ला लिंक करा तुमचे क्रेडिट कार्ड | How to Link Credit Card to UPI

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रातील डिझेल, चासीज, टायर व महागाई भत्त्याच्या मुल्यात बदल झाल्याने त्यानुसार येणारे सुधारीत प्रवास भाडेदर लागू करण्यास मा.संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या व्या बैठकीत पारीत झालेल्या ठराव क्र. 2021 नुसार 17.17% दराने भाडेवाढ करुन भाडेदर आकारणी करणेसाठी म.रा.मा.प.महामंडळास मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रवासभाडे दरवाढीची अंमलबजावणी पुढील प्रमाणे करण्यात यावी.

सुधारीत प्रवास भाडेदर दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ म्हणजेच दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ व २६ ऑक्टोबर २०२१ च्या मधील मध्यरात्रीपासून महामंडळाच्या सर्व प्रवासी वाहतूक सेवांना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

हे देखील वाचा »  Police Bharti Maharashtra: दोन टप्प्यात 20 हजार पोलिसांची भरती, ऑक्टोबर पासून सुरू

दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ म्हणजेच दिनांक २५ ऑक्टोबर, २०२१ व २६ ऑक्टोबर ,२०२१च्या मध्यरात्रीपासून वा तदनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकीट आकारणी करावयाची आहे.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, त्यांना वाहकाने त्या आरक्षण तिकिटाचा जूना तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक त्या तिकीट धारकाकडून वसुल करावयाचा आहे,

थोडक्यात दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ च्या ००.०० तासापासून प्रवास सुरु करणा-या प्रवाशांकडून सुधारीत भाडेदराने भाडे आकारणी करावयाची आहे. ज्या प्रवाशांचा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रवास सुरु होऊन तो दिनांक २६ऑक्टोबर ,२०२१ ला किंवा तद्नंतर संपत आहे अशा प्रवाशांकडुन जूने व सुधारीत प्रवास भाडे फरकाची रक्कम वसुल करण्यात येऊ नये.

हे देखील वाचा »  बैलगाडा शर्यत सुरु परवानगीचा शासन निर्णय आला | Bailgada Sharyat GR

सदर परिपत्रकातील सुधारीत प्रवास भाडेदर प्रवाशांच्या माहितीसाठी सर्व बसस्थानकावरील सूचना फलकावर ठळकपणे प्रसिध्द करण्यात यावेत. जनता, वातानुकूलीत डिलक्स , शितल व महाबस सेवा सध्या चालनात नसल्याने त्यांचे प्रवासी प्रतिटप्पा दर दिले नाहीत.

 

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top