दहावी बारावी परीक्षा जुन्याच पद्धतीने होणार, काही सवलती बंद | SSC HSC Exam 2022-23 Update

By Shubham Pawar

Published on:

SSC HSC Exam 2022-23 Update – दहावी-बारावीची परीक्षा जुन्या पद्धतीनेच होणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोनामध्ये देण्यात आलेल्या सवलती बंद

कोरोनामुळे दहावी व बारावी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या शाळा तिथे परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रम कपात या सवलती यापुढे रद्द करण्यात येणार आहेत. आगामी वर्षात फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या परिणामांचा विचार करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्य 2022 मध्ये घेण्यात अलेल्या परीक्षेमध्ये अनेक सवलती दिल्या होत्या. यामध्ये अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केली होती. \”SSC HSC Exam 2022-23 Update\”

पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ दिला होता. यावर्षी \’शाळा तिथे परीक्षा केंद्र न ठेवता जवळच्या शाळेतील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल तर 2023 ची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आहे तशाच राहतील.

SSC HSC Exam 2022-23 Update

यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे होतील. कोरोनामुळे दिलेली अधिक वेळ व इतर सवलती असणार नाहीत. पूर्वीच्या परीक्षा केंद्र जोडणीनुसार मुख्य केंद्रावरच परीक्षेचे आयोजन होईल, असे बैठकीदरम्यान राज्य मंडळाने म्हटले आहे. {SSC HSC Exam 2022-23 Update}

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment