शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरावा? PDF, Form Download केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत.
तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश, २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक आहे.
राज्यातील कार्यरत बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेसाठी शोध मोहिम दि.01-02-2022ते दि. 30-04-2022 या कालावधीमध्ये राबविण्यात यावी.
shidha patrika tapasni namuna form kasa bharava? form Download, shidha patrika tapasni namuna form kaise bhare? shidha patrika tapasni namuna pdf

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम 2022
सदर शोध मोहिमेत खालीलप्रमाणे कार्यवाही होईल
- (अ) सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेणे-:
- (१) शहरातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करावी.
- (२) वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील / कार्यालयातील रास्तभाव / अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी / तलाठी यांचेमार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येतील.
- (३) शासकीय कर्मचारी / तलाठी यांनी संबंधीत रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरून दिलेले फॉर्म स्विकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी.
- (४) फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदा. भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन/ मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र ( कार्यालयीन/ इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जूना नसावा.
- (५) मिमध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेवून, सर्व फॉर्म यादीसह संबधित शासकीय कर्मचारी/तलाठी यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत.
- वरील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे.
नवीन Update :- शासन परिपत्रक आले आहे – राज्यात दिनांक ०१.०२.२०२२ ते ३०.०४.२०२२ या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहिम राबविण्यात आली होती.
दिनांक २८.०१.२०२२ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. सदर मोहिम प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत “स्थगित” करण्यात येत आहे.
मोहिमेत खालीलप्रमाणे कार्यवाही होईल
(ब) आलेल्या माहितीची तपासणी करणे :
- १) वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या नमुन्यांची त्यासोबतच्या कागदपत्रांच्या तपासणी पुरवठा क्षेत्रीय कार्यालयांनी करावी.
- २) वरील छाननी केल्यानंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी “गट अ” म्हणून करावी. तर “गट ब” मध्ये पुरावा न देणाऱ्यांची यादी करावी.
- ३) “गट- अ” यादीतील शिधापत्रिका धारंकाची शिधापत्रिका पुर्ववत चालू/कार्यरत राहील.
- ४) “गट- ब” यादीतील शिधापत्रिका त्वरीत निलंबित करण्यात याव्यात. अशा शिधापत्रिकेवर
- शिधावस्तू देण्याचे त्वरित थांबविण्यात यावे. व त्यानुसार दुकानदारास देण्यात येणाऱ्या नियतनात कपात करण्यात यावी.
- ५) वरील १ ते ४ प्रमाणे कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करण्यात यावी.
- ६) “गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना आणखी १५ दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा देण्यास सांगावे. आवश्यकतेनुसार पुरावा देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा. त्यानंतरही पुरावा न आल्यास, पुरावा देऊ न शकलेल्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात. ही कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करावी.
वरील (अ) व (ब) प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची दक्षता
- १) शिधापत्रिकेची तपासणी करताना, एका कुटुंबात व एका पत्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळया शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी/ शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा.
- २) एकाच पत्यावर दोन शिधापत्रिका विभक्त कुटुंबामध्ये देताना, दोन्हीही शिधापत्रिका बी.पी.एल. अथवा अंत्योदय अन्न योजनेच्या असणार नाहीत.
- ३) वरील “गट अ” व “गट ब” मधील यादी जनतेस व प्रसिद्धी माध्यमास देण्यास प्रत्यवाय राहणार नाही.
- ४) पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत पोलीसांकडून तपासणी करून घेण्यात यावी.
- ५) विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे
दक्षता घेण्यात यावी.
शिधापत्रिका तपासणी नमुना 2022 कसा भरावा?
- वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना, शासकीय/निमशासकीय कार्यालयातील/खाजगी कंपन्यातील कर्मचारी/कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रूपये १ लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात याव्यात व त्यांच्या मागणीनुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी.
- शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरीकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. विदेशी नागरीकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी. त्याचप्रमाणे दुबार, अस्तीत्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरीत व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे.
- शिधापत्रिकांच्या तपासणीचा आढावा घेऊन तपासणीची कार्यपध्दती व इतर बाबींसाठी जिल्हाधिकारी तसेच मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी नियंत्रक शिधावाटप संचालक,नागरी पुरवठा, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी.
लवकर हा फॉर्म भरून द्या – शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा?🔴हा फॉर्म नाही भरला तर रेशन कार्ड रद्द होईल
🔴 अर्ज फॉर्म डाऊनलोड करा कोरा - PDF FORM DOWNLOAD 🔴 अर्ज फॉर्म डाऊनलोड करा भरलेला नमुना - Demo Namuna PDF Form Download
या समितीमध्ये पुढीलप्रमाणे
सदस्य असावेत :(१) जिल्हाधिकारी/नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा,मुंबई (२) आयुक्त महानगरपालिका (३) पोलीस आयुक्त (४) पोलीस अधिक्षक (५) मुख्य कार्यकारी अधिकारी (६) अप्पर जिल्हाधिकारी (७) मुख्याधिकारी, अ वर्ग नगरपालिका (८) जिल्हा पुरवठा
अधिकारी/उप नियंत्रक शिधावाटप शिधापत्रिका चुकीच्या पध्दतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी / कर्मचारी जबाबदार असल्यास, संबधिताविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी.
जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयांना वितरित केलेले अर्ज तसेच शिधापत्रिकाधारकांना वितरित केलेले अर्ज व शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ ठेवावा.
वरीलप्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांची विशेष शोध मोहिम राबविण्यात यावी. या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याप्रमाणात रास्तभाव दुकानांकडील कोटा कमी करण्यात यावा.
अपात्र शिधापत्रिका मोहिमेबाबतचा अहवाल दिनांक १५ मे, २०२२ पर्यंत शासनास सादर करण्यात यावा.
namaste sir mi youtube madhe join honyacha prayatn karat hoto pan hot nahiye sir YOUTUBE JOIN VAR EK VIDEO NAKKI BANVA SIR