महाराष्ट्र: शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी आली पहा तुमचे नाव, अशी करा डाऊनलोड || या कारणामुळे तुमचे नाव नाही Shetkari Karj Mafi Yadi 2021
🔴 अपात्र यादी तुम्हाला तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्येच मिळेल.
तुमचे नाव का नाही आले? तुम्ही अपात्र कशामुळे हे वाचा👇👇
- तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर अपात्र आहात.
- तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी सुद्धा अपात्र आहात.
- तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा अगोदर लाभ घेतला आहे त्यामुळं अपात्र आहात.
- यांना सुद्धा लाभ मिळणार नाही – आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
- जर तुमचे कर्ज हे ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि पुनर्गठीत पीक कर्ज असेल तरच होणार माफ!
- कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
- राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !