शेततळ्यासाठी 75 हजारापर्यंत अनुदान योजना | Shet Tale Anudan Yojana 2022

Shet Tale Anudan Yojana

Shet Tale Anudan Yojana 2022 – शेततळ्यासाठी 75 हजारांपर्यंत अनुदान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून लाभ.

Shet Tale Anudan Yojana 2022

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळ्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची नवी कार्यपद्धती कृषी आयुक्तालयाकडून लवकरच जारी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या योजनेत यंत्राद्वारे शेततळे खोदण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र राज्यात शक्य होईल त्या ठिकाणी शेततळे खोदाईची सांगड महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी घालावी. “Shet Tale Anudan Yojana”

अशी सूचना कृषी खात्याचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी जारी केलेल्या शासन निर्णयात केली आहे. शेततळ्यांचे अनुदान वाटताना महाडीबीटीचा वापर केला जाणार असून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड सोडतीहारे केली जाणार आहे.

शेततळ्यासाठी 75 हजारापर्यंत अनुदान योजना

30 मीटर बाय 25 मीटर बाय 3 मीटर तसेच 30 मीटर बाय 30 मीटर बाय 3 मीटर या दोन्ही श्रेणीतील शेततळ्यांसाठी आता 75 हजारापर्यंत अनुदान मिळेल. पूर्वी अनुदानाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत होती.

मात्र अनुदान जमा करताना शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्याचा वापर करावा लागणार आहे. शेततळ्यांमुळे राज्यात नगदी शेतीमाल उत्पादनाला चालना मिळाली आहे. विशेषतः फळे व भाजीपाला उत्पादनात शेततळ्यांची भूमिका मोलाची ठरली आहे. राज्याचा 80 टक्क्यांपेक्षा जास्त भाग कोरडवाहू असल्यामुळे सिंचन सुविधा तयार केल्या तरच शेतकरी उत्पन्नात भर पडते हे सिद्ध झालेले आहे. ‘Shet Tale Anudan Yojana’

त्यामुळेच राज्य शासनाने शेततळ्यांना अनुदान देणारी योजना पुढे आणली. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात या योजनेसाठी एक लाखापर्यंत अनुदान देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र योजना घोषित होताना अनुदान रक्कम केवळ 50 हजार रुपये ठेवण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top