Sheli Palan Yojana Maharashtra 2022: शेळी/ मेंढी गट वाटप, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सन 2011-12 पासून कार्यान्वित असून या दोन्ही योजनांतर्गत लाभ धारकांना लाभ देताना, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा यांची संदर्भाधिन शासन निर्णयांमध्ये विहित केलेली किंमत आधारभूत मानून त्यानुसार लाभ देण्यात येत आहेत.
परंतु, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा यांच्या किंमतीत वेळोवेळी वाढ होत असल्याने, शासन निर्णयात विहित दराने शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असून, त्याबाबत लाभधारक तसेच लोकप्रतिनिधी कडून उक्त योजनांतर्गत दर सुधारित करण्याची वारंवार मागणी करण्यात येत आहे.
त्यानुषंगाने राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजनेमध्ये एकरुपता आणण्याच्या दृष्टीने राबविण्यात असलेल्या योजनांमधील शेळी मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी व आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळून शेळ्या/ मेंढ्यांचे सध्याचे बाजार मूल्य विचारात घेऊन, उक्त किंमतीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
राज्यस्तरीय योजना Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra
योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे
टीप :-
- सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
- योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
- योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
- अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
- महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील) Sheli Palan Yojana Maharashtra
अधिक माहिती साठी हा शासन निर्णय:- पहा
जिल्हास्तरीय योजना Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra
योजनेचे नाव – 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे
टीप :-
- योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
- योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
- लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
- अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
- महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील) Sheli Palan Yojana 2022
एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात) |
---|---|---|---|
1 | शेळ्या खरेदी | ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम ) ६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | ८०,०००/- (१० शेळ्या ) ६०,०००/- (१० शेळ्या ) |
2 | बोकड खरेदी | १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर ) ८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर ) | १०,०००/- (१ बोकड ) ८,०००/- (१ बोकड ) |
3 | शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी ) |
4 | शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) ७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी ) |
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात) |
---|---|---|---|
1 | मेंढया खरेदी | १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ ) ८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | १,००,०००/- (१० मेंढया ) ८०,०००/- (१० मेंढया ) |
२ | नरमेंढा खरेदी | १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ) १०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर ) | १२,०००/- (१ नरमेंढा ) १०,०००/- (१ नरमेंढा ) |
3 | मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |
4 | शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) १,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | गट | प्रवर्ग | एकूण किंमत | शासनाचे अनुदान | लाभार्थ्याचा स्वहिस्सा |
---|---|---|---|---|---|
1 | शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी | सर्वसाधारण | १,०३,५४५/- | ५१,७७३/- | ५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- | ||
2 | शेळी गट – अन्य स्थानिक जाती | सर्वसाधारण | ७८,२३१/- | ३९,११६/- | ३९,११५/- |
अनु. जाती व जमाती | ७८,२३१/- | ५८,६७३/- | १९,५५८/- | ||
3 | मेंढी गट – माडग्याळ | सर्वसाधारण | १,२८,८५०/- | ६४,४२५/- | ६४,४२५/- |
अनु. जाती व जमाती | १,२८,८५०/- | ९६,६३८/- | ३२,२१२/- | ||
४ | दख्खनी व अन्य स्थानिक जाती | सर्वसाधारण | १,०३,५४५/- | ५१,७७३/- | ५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे Sheli Palan Yojana
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
- सातबारा (अनिवार्य)
- 8 अ उतारा (अनिवार्य)
- अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
- आधारकार्ड (अनिवार्य )
- रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
- बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)
- रेशनकार्ड/ कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (अनिवार्य)
- 7-12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
- अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
- दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
- वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
- रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत (Sheli Palan Yojana Maharashtra Government 2022)
अधिक माहिती साठी शासन निर्णय:- पहा
ओपन हिंदू मराठा हा या योजनेचा लाभ घेवू शकतो का?