ऑनलाइन अर्ज शेळी, मेंढी गट वाटप, गाय, म्हैस वाटप, कुक्कूटपालन योजना 2022 महाराष्ट्र

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन विभागा अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना साठी ऑनलाईन पद्धतीने फाॅर्म भरणे चालू आहे. ऑनलाईन फाॅर्म भरण्याची अंतिम तारीख :- 18 डिसेंबर 2022

शेळी मेंढी गट वाटप गाय म्हैस वाटप कुक्कूटपालन योजना

🔯 राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
1) योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे.

राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई / म्हशी चे वाटप करणे.

संकरित गाय- एच. एफ. / जर्सी म्हैस – मुन्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी –

टीप:

  1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

🔯 राज्यस्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे
2)योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.

🔯 राज्यस्तरीय योजना – 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे
3) योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

🔯 जिल्हास्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे
4)योजनेचे नाव -जिल्हास्तरीय १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.

🔯 जिल्हास्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
5)योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभाथींना वाटप करणे.

🔯 जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट वाटप करणे
6)योजनेचे नाव -८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.

🔯 जिल्हास्तरीय योजना – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे
7)योजनेचे नाव -एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे

👉 १) अर्जदार यांचे आधारकार्ड.

👉 २) मोबाईल नंबर.(आवश्यक) व ईमेल आयडी(असल्यास)

👉 ३) ७/१२ व ८अ उतारे (अनिवार्य)(उतारे उपलब्ध नसल्यास काढून दिले जातील)

👉 ४) रेशन कार्ड सत्यप्रत (रेशन कार्ड वरील बारा अंकी नंबर आवश्यक)

👉 ५) रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधारकार्ड नंबर (अनिवार्य )

👉 ६) राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )

👉 ७) अर्जदार यांचा फोटो व सही.

👉 ८) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

👉 ९) दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य).

👉 १०) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य).

अर्जाची मुदत 04 डिसेंबर ते 18 डिसेंबर

1 thought on “ऑनलाइन अर्ज शेळी, मेंढी गट वाटप, गाय, म्हैस वाटप, कुक्कूटपालन योजना 2022 महाराष्ट्र”

Leave a Comment