शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज | Sharad Pawar Gram Samrudhi Yojana Detailed Information

By Marathi Corner

Published on:

नमस्कार मित्रांनो ,आज आपण शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samrudhi Yojana) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे मुख्यमंत्री रोजगार योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळे अनुदान व योजना सरकारद्वारे राबवले जातात. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे Sharad Pawar Gram Samrudhi Yojana. माननीय माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांच्या सन्मानार्थ या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 12 डिसेंबर 2020 पासून म्हणजेच त्यांच्या वाढदिवसा पासून योजना सुरू झाली आहे. योजना अंतर्गत पक्का गोठा बांधकाम, शेळी पालन शेड बांधकाम, कुक्कुटपालन शेड बांधकाम,भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग इत्यादी प्रकल्पांसाठी अनुदान मिळते.

महाराष्ट्र सरकार द्वारा चालली जाणारी Sharad Pawar Gram Samrudhi Yojana १२ डिसेंबर 2020 ला सुरू झाली. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी या योजनेचे लाभार्थी असतील. Sharad Pawar Gram Samrudhi Yojana योजनेसाठी कोणतेही अधिकृत वेबसाईट नाही. अर्ज करण्याची पद्धत देखील ऑफलाईन आहे. शेतकऱ्यांना समृद्ध म्हणून ग्रामीण भागाचा विकास साधने हा हेतू योजनेमध्ये आहे. अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जीआर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

sharad-pawar-gram-samrudhi-yojana

योजनेचे लाभ

ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना त्यांचे पाळीव प्राणी जसे गाई, शेळ्या किंवा कुक्कुटपालन करण्यासाठी गोठे, शेड इत्यादी बांधकाम खर्च साठी अनुदान मिळेल. अगदी ज्या शेतकऱ्यांकडे फक्त दोन जनावर आहेत अशा शेतकऱ्यांना देखील फायदा घेता येईल. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच (MGNREGA) सोबत पूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती देखील या योजनेमुळे होणार आहे.

गाय म्हैस गोठा अनुदान

शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे सहा गुरांकरिता 26.95 चौ.मी.जमीन पुरेशी आहे. तसेच त्याची लाांबी 7.7 मी. आणि रुंदी 3.5 मी.असावी. गव्हाण 7.7 मी. X 0.2 मी. X 0.65 मी. आणि 250 लीटर क्षमतेचे मूत्रसांचय टाके बाांधण्यात यावे. जनावराांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बाांधण्यात यावी.

शेळीपालन शेड बांधणे

शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे 10 शेळयाांकवरता 7.50 चौ.मी. निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी 3.75 मी. आणि रुंदी 2.0 मी.असावी. चारही भिंतींची सरासरी उंची 2.20 मी. असावी. भिंती 1 : 4 प्रमाण असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात. छतास लोखांडी तुळयाांचा आधार देण्यात यावा. छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखांडी पत्रे / व सिमेंटचे पत्रे वापरावेत. तळासाठी मुरुम घालावा. शेळयाांना पिण्याच्या पाण्याची टाकी बाांधावी.

कुक्कुट पालन शेड बांधणे

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे 100 पक्षयाांकवरता 7.50 चौ.मी.निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी 3.75 मी. आणि रुंदी 2.0 मी.असावी. लाांबीकडील बाजूस 30 सेमी उंच व 20 सेमी जाडीची, विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी. तसेच छतापर्यंत कुक्कूट जाळी 30 सेमी X 30 सेमीच्या खांबांनी आधार दिलेली असावी. आखूड बाजूस 20 सेमी जाडीची सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत असावी. छतास लोखांडी तुळयाचा आधार द्यावा.छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखांडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरावेत. तळयाच्या पायासाठी मुरुमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा 1 : 6 प्रमाण असलेला मजबूत थर असावा. पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

भू-संजीवनी नाडेप कांपोस्टींग

शासन निर्णयात सांगितल्याप्रमाणे नाडेप कांपोस्टींग अंतर्गत 3.6 मी X 1.5 मी X 0.9 मी आकाराचे जमिनीवरील बाांधकाम अपेक्षीत असून, त्यापासून साधारणत: 2 ते 2.25 टन कांपोस्टींग खत 80 ते 90 दिवसात तयार होते. हे खत 0.25 हेक्टर क्षेत्रास पुरेसे आहे. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांपासून सेंद्रीय खत तयार करुन, परत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रीय खताांमुळे जमिनीचा कस व जलधारण शक्ती वाढून पोषक द्रव्याांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभूशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्षम जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. नाडेपच्या बांधकामातील चारही भिंतीत छिद्रे ठेवली जातात, जेणेकरुन त्यातून हवा खेळती राहून सेंद्रीय पदार्थांचे विघटन होण्यास, कुजण्यास चालना मिळते. Sharad Pawar Gram Samrudhi Yojana

गाय म्हैस गोठा अनुदानरु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )
शेळीपालन शेड बांधणेरु.49,284/- (प्रमाण 100 टक्के )
कुक्कुट पालन शेड बांधणेरु.49,760/- (प्रमाण 100 टक्के )
भू-संजीवनी नाडेप कांपोस्टींगरु.10,537/- (प्रमाण 100 टक्के )

प्रशिक्षण

या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना लखपती करणे हा उद्देश असल्याने इतर जोड धंदे देखील सुरू करण्यासाठी हे प्रशिक्षण असेल. त्यामध्ये गोट्यांचे व्यवस्थापन जनावरांचे आरोग्य व योग्य संगोपन आणि चारा व पशुखाद्य निर्मिती तसेच गुरांच्या शेण लेंडी व विष्ठेपासून सेंद्रिय खताचे विविध प्रकार तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana लाभार्थी पात्रता

 • लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असावा
 • ग्रामीण भागातील शेतकरी पात्र
 • स्वतःची जमीन असणे आवश्यक
 • इतर कोणत्या योजनेमधून गोठा शेड बांधले असेल तर या योजनेतून लाभ नाही

कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. रेशन कार्ड
 3. पासपोर्ट आकाराचा फोटो
 4. उत्पन्नाचा दाखला
 5. रहिवासी दाखला
 6. घोषणापत्र
 7. ग्रामपंचायतचे शिफारस पत्र

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana अर्ज 

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करावे लागेल. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी लागतील. त्याची पोचपावती तुम्ही घेऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला भेट देऊन माहिती मिळू शकतात. अर्जाची प्रत येथून मिळवू शकता.

Conclusion

मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samrudhi Yojana) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट ,ती योजना म्हणजे काय इत्यादी. ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा आणण्यासाठी सुरू केली गेली आहे. माजी केंद्रीय मंत्री श्री. शरद पवार यांच्या सन्मानार्थ या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. गाय-म्हैस गोठा, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड, नापेड कंपोस्टिंग प्रकल्प इत्यादींसाठी अनुदान या योजनेद्वारे मिळते. त्यासाठी अर्ज ग्रामपंचायतची द्वारे ऑफलाइन करता येतो. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !

Leave a Comment