Ration Card new update – घरात ट्रॅक्टर, कार असेल तर रेशनचे धान्य होणार रद्द. घरोघरी होणार तपासणी: उस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला अर्ज भरण्यास पुढाकार परिस्थिती चांगली असतानाही रेशनचे धान्य घेणाऱ्या उस उत्पादक पट्ट्यातील शेतकन्यांनी रेशनचे धान्य नको म्हणून पुरवठा विभागाकडे अर्ज करण्यास पुढाकार घेतला आहे. यात पंढरपूर तालुका आघाडीवर असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
Ration Card new update
गोर गरीब व गरजूना रेशनचे धान्य भरपूर उपलब्ध म्हणून जिल्हा पुरवठा विभागातर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांनी सन नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेतून स्वताहून धान्य सोडासाठी आवाहन केले आहे. “Ration Card new update”
या उपक्रम लाबासी, मोहोळ, पंढरपूर या तालुक्यात ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सपन शेतकयांनी स्वताहून अन्नसुरक्षा योजनेतुन बाहेर पडण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालयांकडे अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
आर्थिकदृष्ट्या चांगल्या असणार्या लाभार्थीनी स्वताहुन धान्य सोडल्यास त्या धान्याचा गर व वंचित कार्डपारकांना ह्या योजनेचा लाभ घेता रेशन धान्य दुकानदार संघटनेचे नितीन पेंटर यांनी सांगितले.
तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे का
तलाठी तुमच्या घरी चौकशीला आल्यावर अहवालात पुढील माहिती भरून घेणार आहेत. तुमचे घर कच्चे की पके, घराची किमत शेती किती असेल तर जिरायत की बागायत कुटुंबातील व्यक्ती, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, घरातील वाहने दुचाकी, चार चाकी, ट्रैक्टर आहे काय याची माहिती संकलीत केली जाईल, बागायती जमीन, कार, ट्रॅक्टर असणाऱ्यांचे धान्य आपोआप बंद होणार आहे.
तर होणार चौकशी
दरम्यान श्रीमांतांकडून रेशनचे धान्य घेतले जाते काय याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या सधन व्यक्ती स्वतःहून रेशनचे धान्य सोडणार नाहीत अशांच्या घरी तलाठी, पुरवठा निरीक्षक, मंडल अधिकारी स्वतः जाउन चौकशी करणार आहेत. चौकशीत कुटुंबातील व्यक्ती सधन असतील रेशनचे धान्य आपोआप रद्द होणार आहे. (Ration Card new update)
रेशनवरील धान्य सोडा; अन्यथा कारवाईला सामोरे जा
सरकारी नोकरदार, बागायती शेती, खासगी क्षेत्रातील मोठे पगारदार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
जेणेकरून ते धान्य गरजूंना देता येणार आहे. त्यामुळे सधन नागरिकांनी स्वस्त धान्यावरील हक्क स्वतःहून सोडावा; अन्यथा तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहर, जिल्ह्यात सध्या रेशनकार्डला आधार जोडणीचे काम सुरू आहे. जिल्हाभरात दुबार तसेच आधार न जोडलेल्या सुमारे ९० हजारहून अधिक लाभार्थी कमी केले आहेत. या मोहिमेत रेशनवरील धान्य घेत असलेल्या उच्च उत्पन्न गटातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. “Ration Card new update”
यातून केली जाणारी कारवाई टाळण्यासाठी आयकर भरणारे, तसेच उच्च उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली माहिती द्यावी, धान्यावरील हक्क सोडावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे.
नागरिकांनीही माहिती द्यावी
- नागरिकांनीही त्यांच्या माहितीतील अशा लोकांची माहिती पुरवठा विभागाकडे द्यावी. त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. त्यासाठी गिव्ह इट अॅपचे अर्ज सर्व स्वस्त धान्य दुकानदा रांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- धान्यावरील हक्क सोडण्यासाठी हे नागरिक स्वतःहून पुढे यावेत, अन्यथा पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी करून स्वस्त धान्य मिळविण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती सादर करून शिधापत्रिका मिळविल्याबद्दल थेट कारवाई करण्यात येणार आहे.
- यात सहकार्य केल्यास गरीब व गरजू नागरिकांना प्राधान्याने धान्य उपलब्ध करून देण्यास मदत होईल, असेही सुरेखा माने सांगितले. {Ration Card new update}