शिवराम हरी राजगुरू माहिती मराठी | Rajguru Information in Marathi

Rajguru Information in Marathi:- शिवराम हरी राजगुरू हे महाराष्ट्रात जन्मलेले भारतीय क्रांतिकारी होते. त्यांचे नाव नेहमी भगत सिंह व सुखदेव यांच्या नावासोबत घेतले जाते. कारण भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यां तिघांना 23 मार्च 1931 ला इंग्रजांनी फासावर चढवले होते. भारतीय स्वातंत्र्य युद्धातील या वीरांचे बलिदान अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती.

राजगुरू यांनी अतिशय कमी वयात देशासाठी आपले जीवन अर्पण केले म्हणूनच त्यांचे बलिदान आजही देशात आठवण केले जाते. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला राजगुरू यांची मराठी माहिती देणार आहोत. तर चला सुरू करुया

Rajguru information in marathi

जन्म व बालपण

राजगुरू यांचा जन्म 1908 साली महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या खेड या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. राजगुरू यांचे पूर्ण नाव ‘शिवराम हरी राजगुरू’ होते. राजगुरू यांच्या वडिलांचे नाव हरी नारायण होते, त्यांनी दोन विवाह केले होते. हरी नारायण यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव पार्वतीबाई होते. पार्वतीबाई व हरी नारायण यांना 5 अपत्य होते. राजगुरू हे त्यांचे पाचवे अपत्य होते.

6 वर्षाच्या वयात राजगुरू यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांचे संगोपन त्यांचे मोठे भाऊ व आईने केले. राजगुरू लहानपणापासून देश प्रेमी होते, त्यांचे विचार क्रांतिकारी होते. ‘Rajguru Information in Marathi’

राजगुरू यांचे शिक्षण

राजगुरू यांनी आपले प्रारंभिक शिक्षण गावातील एका मराठी शाळेत प्राप्त केले. लहानपणी 14 व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे त्यांच्या भावाने आपल्या नववधू समोर त्यांना इंग्रजी धडा वाचण्याची शिक्षा केली. हा अपमान सहन न झाल्याने राजगुरू यांनी अंगावरच्या कपड्यानिशी, आईने तेल आणायला दिलेले 9 पैसे व बहिणीने अंजीर आणण्यासाठी दिलेल्या 2 पैश्यांसह आपले घर सोडले. “Rajguru Information in Marathi”

घर सोडल्यानंतर राजगुरू शिक्षणासाठी काशी (वाराणसी) जाऊन पोहचले. येथे त्यांनी आपले शिक्षण आणि संस्कृत विषयाचा अभ्यास केला. 15 वर्षाच्या वयापर्यंत त्यांना संस्कृत भाषेचे चांगले ज्ञान झाले, ते एक ज्ञानी व्यक्ती बनले होते. अभ्यासादर्म्यान ते चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी प्रभावित झाले.

राजगुरु माहिती मराठी Rajguru Information in Marathi

राजगुरू यांचे क्रांतिकारी जीवन

जेव्हा राजगुरू वाराणसीत आपले शिक्षण घेत होते तेव्हा त्यांची भेट अनेक क्रांतिकारीशी झाली. क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी 1924 साली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ला जॉईन केले. ही एक सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती आणि या संघटनेत भगत सिंह, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, यतींद्रनाथ दास या सारखे क्रांतिकारी देशभक्त युवक सामील होते.

या संघटनेचा प्रमुख उद्देश देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे होते. संघटनेच्या सदस्याच्या रूपात राजगुरू यांनी पंजाब, लाहोर, आग्रा आणि कानपूर सारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन लोकांना संघटित करणे सुरू केले. यादरम्यान त्यांची भेट भगत सिंह यांच्याशी झाली. व दोघांची चांगली मैत्री जमली. या दोघी वीरांनी मिळून ब्रिटिश शासनाला समाप्त करण्यासाठी मोलाचे करू केले. “Rajguru Information in Marathi”

हे देखील वाचा MARRIAGE ANNIVERSARY WISHES IN MARATHI

लाला लजपतराय यांच्या हत्येचा सूड

सुरुवातीच्या काळात हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली अनेक शांततापूर्ण आंदोलन केले. परंतु सायमन कमिशन च्या विरोधात सुरू असलेल्या शांततापूर्ण मिरवणूक व आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

या लाठीचार्ज दरम्यान लाला लजपतराय यांना डोक्यावर मार लागून ते शहीद झाले. या घटनेचा जवाबदार इंग्रज पोलिस अधिकारी स्कॉट याला समजून भगत सिंह व राजगुरू यांनी त्याला मारण्याचा निश्चय केला. परंतु भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी चुकून स्कॉट ऐवजी साँन्डर्स ची गोळी मारून हत्या केली.

हत्येनंतर आपला वेश पालटून इंग्रजांच्या नजर चुकवून त्यांनी लाहोर सोडले. भगत सिंह लाहोर हून हावडा पोहोचले तर राजगुरू लखनऊ व तेथून बनारस गेले. Rajguru Information in Marathi

पुण्यात राजगुरू यांना अटक

क्रांतिकारकांच्या वाढत्या मोहिमेमुळे इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी पूर्ण शक्ती लावली. राजगुरू उत्तरप्रदेशातून नागपूर येथे आले. व तेथे आरएसएस च्या एका कार्यकर्त्याच्या घरी आश्रय घेतला. 30 सप्टेंबर 1929 ला नागपूरहून पुण्याला जात असताना इंग्रजांनी त्यांना पकडले. इंग्रजांनी विधानसभेत बॉम्ब फेकल्यावर भगत सिंह, सुखदेव तसेच क्रांतिकारी दलाच्या इतर क्रांतिकारकांनाही पकडले होते. ‘Rajguru Information in Marathi’

राजगुरू यांचा मृत्यू

लाहोर मध्ये सर्व क्रांतिकारकांवर खटला चालवण्यात आला. राजगुरू, सुखदेव आणि भगत सिंह यांच्यावर साँन्डर्स च्या हत्येचे अपराधी असल्याचा निकाल लावण्यात आला. व यांनतर 23 मार्च 1931 मध्ये त्या तिघांना फाशी देण्यात आली. इतिहासकारांच्या मते हे वीर आपल्या मृत्यूच्या पूर्वी आनंदाने गाणे गात होते.

मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार फिरोजपुर जिल्ह्यातील सतलज नदीच्या काठावर करण्यात आले. आणि अश्या पद्धतीने भारत मातेचे खरे वीर देशासाठी अर्पण झाले होते.

तर मित्रांनो ही होती information about Rajguru in marathi किंवा rajguru marathi mahiti आशा करतो की राजगुरू यांची ही मराठी माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल.

आपले देशाचे नेते व क्रांतिकारकांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा… धन्यवाद.

 

Leave a Comment

close button