रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसाचा दिवाळी बोनस मिळणार | Railway Employees Diwali bonus Update

Railway Employees Diwali bonus Update – रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस.

Railway Employees Diwali bonus Update

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस दिला जाणार असल्याची माहिती कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट असल्याची भावना रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. 11.27 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 1832 कोटी रुपयांचा उत्पादकता लिंक्ड बोनस दिला जाणार आहे. याची कमाल मर्यादा 17,951 रुपये असेल असे ठाकूर यांनी सांगितले.

बोनसच्या निर्णयासह आजच्या बैठकीत तेल कंपन्यांना 22 हजार कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्यासह मंजूरी देण्यात आली. जगात एलपीजीच्या किमती वाढत असल्याने सामान्यांनावर आर्थिक ताण पडत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला.

Leave a Comment

close button