pune mhada lottery online sodat – पुणे म्हाडाच्या 5211 घरांसाठी आज ऑनलाइन सोडत. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील म्हाडाच्या तब्बल 5211 घरांची सोडत उद्या दि. 18 रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी 10 वाजता ही सोडत काढली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
pune mhada lottery online sodat
म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत विविध योजनांतील 279 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या 2845 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनअंतर्गत 2088 सदनिका एकूण 5211 सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. [pune mhada lottery online sodat]
पुणे मंडळाच्या म्हाडाच्या 5211 सदनिकांसाठी 90081 अर्जदारांनी अर्ज केला आहे. त्यापैकी 71,742 अर्जदारांनी अर्जांची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे. तसेच पुणे मंडळाने दीड वर्षामध्ये एकूण 15,477 सदनिकांची ऑनलाइन सोडत काढण्यात आली. तसेच सन 2016 पासून ऑनलाइन पद्धतीने 20,000 सदनिकांचे वितरण करण्यात आले.
त्यापैकी 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत येणाऱ्या 11,000 सदनिकांची ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण करण्यात आले. एएसआरनुसार फक्त बांधकाम खर्चामध्ये घरे मिळतात. त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. सन 2020-21 या कोविड 19 चा प्रादुर्भाव असतानादेखील पुणे मंडळामार्फत 15,477 सदनिकांचे ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण करण्यात आले आहे. “pune mhada lottery online sodat”
अर्जदारांसाठी उपलब्ध झालेल्या सदनिका
- म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) – 2675 सदनिका
- म्हाडाच्या विविध योजनांतील 279 सदनिका
- म्हाडा P-MAY योजना 170 सदनिका
- 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजना
- पुणे महानगरपालिका- 575 सदनिका
- पिंपरी -चिंचवड महानगरपालिका 1513 सदनिका
- 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (एकूण) – 2088 सदनिका
- एकूण 5211 सदनिका {pune mhada lottery online sodat}
Demo video येथे पहा 👇👇