आता पोलिसांना मिळणार 25 लाखात घरे | Police will get a house worth Rs 25 lakh

Police Will Get A House Worth Rs 25 Lakh – पोलिसांना २५ लाखांत घरे: जितेंद्र आव्हाड आता घरे रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्या.

Police will get a house worth Rs 25 lakh

बीडीडी चाळीत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना आता 50 लाखांऐवजी 25 लाखांत कायमस्वरूपी घरे नावावर करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

तसेच आता घरे रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही घरे मोफत देता येणार नाहीत.

आता पोलिसांना मिळणार 25 लाखात घरे

केवळ बांधकाम खर्च म्हणजे 50 लाखांत घरे देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध
झाला. या पार्श्वभूमीवर आता सरकारने आपली भूमिका बदलली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार आता बीडीडी चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घर 50 लाखांऐवजी 25 लाख रुपयांत देण्यात येईल.

Police will get a house worth Rs 25 lakh

2011 पासून राज्यातील केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त अधिकाऱ्यांना कुठेही घर मिळाले नाही. घराबाबतची शेवटची प्रक्रिया 2011 साली झाली होती.

आता मात्र 350 सदनिकांच्या एकत्रित गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. राज्यातील 2017 पर्यंत महाराष्ट्रात आलेल्या अधिकाऱ्यांना घरांबाबत सुटकेचा निःश्वास टाकता येईल, असेही आव्हाड यांनी द्वीट करीत सांगितले.

Leave a Comment

close button