Police Bharti Maharashtra: दोन टप्प्यात 20 हजार पोलिसांची भरती, ऑक्टोबर पासून सुरू

Police Bharti Maharashtra – दोन टप्प्यांत 20 हजार पोलिसांची भरती. ऑक्टोबरपासून पहिला टप्पा 2021 मधील पदभरतीच्या मान्यतेचा प्रस्ताव. राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून, वारंवारचा बंदोवस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि 2021 मधील तब्बल 19 हजार 758 रिक्त पदांची दोन टप्प्यांत भरती होणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. (Police Bharti Maharashtra)

Police Bharti Maharashtra

राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरुणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. 2019 मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्त पदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही.

आता शिंदे-फडणवीस सरकारने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 2020 मधील सात हजार 231 तर 2021 मधील 12 हजार 527 पदांची भरती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सुरू आहे. {Police Bharti Maharashtra}

तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ‘महाआयटी कडून सुरू आहे. काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानंतर ऑक्टोबर (पुढील महिन्यात) भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. 2021 मधील रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून, त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशीही शक्यता आहे.

भरतीचे संभाव्य नियोजन

7231 पद भरतीला शासनाची मान्यता (नक्षलग्रस्त गडचिरोली भागात 289 व एसआरपीएफ बल क्र. 13 मधील 54 पदांचा समावेश).

पहिल्या टप्प्यातील पोलिस शिपाई भरती ऑक्टोबर 2022 मध्ये होणार.

2021 मध्ये पोलिस शिपाई 10 हजार 404 तर चालक एक हजार 401 आणि सशस्त्र पेलिस शिपायांची 722 पदे रिक्त झाली असून त्याची दुसऱ्या टप्प्यात भरतीची शक्यता 2019 मध्ये भरती झालेल्यांचे प्रशिक्षण डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण होईल; पहिल्यांदा 2020 मधील रिक्त पदांची भरती.

ऑक्टोबरमधील भरती झालेल्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर 2023 मध्ये पूर्ण होईल, त्यावेळी 2021 मधील रिक्त पदांची भरती होईल. “Police Bharti Maharashtra”

2 thoughts on “Police Bharti Maharashtra: दोन टप्प्यात 20 हजार पोलिसांची भरती, ऑक्टोबर पासून सुरू”

Leave a Comment

close button