पोलीस भरती 2022 ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा | Police Bharti Document 2022 Maharashtra

Police Bharti Document 2022 Maharashtra – आवश्यक प्रमाणपत्रे / कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतीम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वीच्या दिनांकाची असावीत व सदरची मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. सदर मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.

पोलीस भरती साठी आवश्यक कागदपत्रे पुढीप्रमाणे

सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

  1. SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
  2. जन्मदाखला
  3. रहिवाशी प्रमाणपत्र
  4. जातीचे प्रमाणपत्र
  5. जात वैधता प्रमाणपत्र
  6. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT)
  7. खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल (शासन निर्णय दि.17/03/2017 व दि. 11/03/2019 प्रमाणे)
  8. महिला उमेदवारांकरिता व अजा, अज उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
  9. माजी सैनिकांसाठी Discharge प्रमाणपत्र
  10. गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र Police Bharti Document 2022 Maharashtra
  11. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  12. भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
  13. पोलीस पाल्य प्रमाणपत्र
  14. अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
  15. अंशकालीन प्रमाणपत्र
  16. इडब्ल्यूएस प्रमाणपत्र
  17. NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे. “Police Bharti Document 2022 Maharashtra”

Police Bharti Document 2022 Maharashtra

उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील.

  • यातील सगळेच imp नाहीयेत – MSCIT,जन्म दाखला,जात वैधता प्रमाणपत्र वगैरे नसलं तरी चालेल.
  • EWS साठी नॉन क्रेमी लेयर गेल्यावर्षी मागितलं नव्हतं.
  • नॉन क्रेमी लेयर 1.4.2021 ते 31.3.2022 पर्यंत च मागितलं आहे.. जर तुमचा कडे मागे काढलेले असेल तर ते सोबत ठेवा आणि नवीन सुद्धा काढून घ्या.
  • कोणत्याही टप्प्यात डोकमेंट्स वर फेल करतील त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका.
  • डॉक्युमेंट वर स्पेलिंग मिस्टेक असेल तर गॅझेट करून ठेवा. {Police Bharti Document 2022 Maharashtra}
  • कास्ट सर्टिफिकेट वर जर तुमचं स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते नवीन काढून घ्या. त्यासाठी स्टॅम्प चालत नाही.

hello click here -

18,331 जागा पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म 2022

तुमची प्रश्न व त्यांची उत्तरे

नॉन क्रेमी लेयर – 2021-2022 साठी च मागीतल आहे. ते नसेल तरी नवीन काढून घ्या. पण ते ग्राह्य धरतील की नाही माहिती नाही.

डोकमेंट्स वर स्पेलिंग मिस्टेक असेल तर काय कराव?

उत्तर – झेडपी मध्ये जाऊन रीतसर गॅझेट करून घ्या. तसेच जर 30 नोव्हेंबरच्या आत तो डॉक्युमेंट नवीन निघत असेल तर तो काढून घ्या.

दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट मार्कलिस्ट किंवा कोणता डॉक्युमेंट ओरिजनल नसेल तर चालेल का?
उत्तर – फॉर्म भरतेवेळी ओरिजनल नसलं तरी चालेल पण भरती वेळी तुम्हाला ओरिजनल सर्व डॉक्युमेंट लागतील.

पोलीस भरतीसाठी height किती लागते?

उत्तर – 165 cm मुलांना, 155 cm मुलींना. स्पोर्ट्स असेल तर 2.5cm कमी असेल तरी चालेल.

चालक साठी मुलांना – 165, मुलींना – 158
SRPF – मुलांना -168 मुलींना – इथे फॉर्म भरता येणार नाही. (Police Bharti Document 2022 Maharashtra)

 डबल फॉर्म भरता येईल का?

उत्तर – अगदी सुरुवातीपासूनच पोलीस भरतीच्या GR मध्ये डबल फॉर्म भरायचे नाही असे स्पष्ट जीआर मध्ये उल्लेख केलेला असतो. तरी सुद्धा भरपूर मुलांनी डबल फॉर्म भरले आणि ते आज नोकरीवर देखील आहेत.
तसेच मागच्या वर्षी चालक पदासाठी सुद्धा डबल फॉर्म भरले गेले होते. त्यानंतर त्यांना डबल फॉर्म भरले म्हणून बाद करण्यात आले. नंतर पुन्हा ते उमेदवार मॅटमध्ये गेल्यामुळे मॅटने त्यांना जॉईन करून घेण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळे याबाबत मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही डबल फॉर्म भरायचा असेल तर ते तुमच्या जबाबदारीवर भरा.

 परीक्षा एकाच दिवशी होईल का?

उत्तर – हा पॉईंट सुद्धा दरवर्षी नमूद केलेला असतो परंतु परीक्षा एकादिवशी कधीही होत नाही. त्यामुळे यावेळेस सुद्धा परीक्षा एकादशी होईल की नाही यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पण परीक्षा एकादशी होत असेल तर सर्वांनाच याचा फायदा होईल. ‘Police Bharti Document 2022 Maharashtra’

अधिक माहितीसाठी शासनाने जो नियुक्त केलेला अधिकारी असेल त्यांच्याशी संपर्क करा.

EWS विद्यार्थ्यांना नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट लागते का?

EWS विद्यार्थ्यांना फक्त EWS लागते, नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट लागत नाही.

MSCIT सर्टिफिकेट सर्वाना कंपल्सरी आहे का?

MSCIT सर्टिफिकेट सर्वाना कंपल्सरी नाही, ज्यांच्याकडे असेल त्यांनी द्यावे, नसेल तर सरळ नाही करावे.

12 thoughts on “पोलीस भरती 2022 ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा | Police Bharti Document 2022 Maharashtra”

Leave a Comment

close button