पोलिस भरती मध्ये अगोदर मैदानी चाचणी होणार, 7 हजार 231 पदांची भरती जुलै मध्ये | police bharti 2022 maharashtra new update

Police Bharti 2022 Maharashtra New Update – 7 हजार 231 पदे जुलै, ऑगस्टमध्ये भरणार पोलीस भरतीत आधी ‘मैदानी’ काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 15 हजार जागांची तातडीने भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचाच एक भाग म्हणून येत्या जुलै आणि ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे.

Police Bharti 2022 Maharashtra New Update

मात्र त्यावेळी उमेदवारांची प्रथम लेखी नाही तर मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान त्यात गोळाफेक, पुलअप्स, लांबउडी आणि 100 मीटर धावणे अशा चाचण्या घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

शहरातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबवताना हा निकष पूर्वीपासून होता. मात्र मध्यंतरी ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस सेवेत संधी मिळावी प्र म्हणून बंद करत आता लेखी चाचणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या 2 वर्षांत कोरोना काळात नवीन पदांची भरतीच झालेली नाही. तर 2019 मध्ये जाहीर झालेली पाच हजार पदांची भरती प्रक्रिया रडतखडत दीड वर्षे चालली होती. आता नवीन 15 हजार पदांची भरती होत असली तरी 2020 मध्ये घोषित झालेल्या भरतीच अद्याप मार्ग मोकळा झालेला नाही.

पोलीस नाईक पद रद्द केल्यामुळे बिंदुनामावली बदलावी लागली

भरीस भर म्हणून गृह विभागाकडून काही महिन्यांपूर्वी पोलीस नाईक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भरती प्रक्रियेतील बिंदुनामावली पुन्हा बदलावी लागली आहे.

तर दुसरीकडे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्यांना थेट हवालदारपदी नियुक्ती करताना त्या प्रमाणात जागा रिक्त नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजून अनेकांना त्याच पदावर काम करावे लागत आहे.

यामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र आता त्या बाबींची पूर्तता झाल्याने पुढील महिन्यात भरती प्रक्रियेला सुरवात होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

50 हजार पदे रिक्त

या भरतीच्या वेळी लेखीऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला जाईल अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या मुंबईसह राज्यभरात पोलिसांची जवळपास 2 लाख 28 हजार इतकी संख्या आहे.

मात्र तरीही सुमारे 50 हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले जात आहे. आताच्या भरतीत पहिल्या टप्प्यात 2020 मधील 7 हजार 231 पदांची भरती करून नंतरच्या टप्प्यात 2021 व 2022 मधील रिक्तपदांची एकत्रित भरती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

2 thoughts on “पोलिस भरती मध्ये अगोदर मैदानी चाचणी होणार, 7 हजार 231 पदांची भरती जुलै मध्ये | police bharti 2022 maharashtra new update”

Leave a Comment

close button