Pmjjby And Pmsby Changes In Premium Rates – प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) च्या प्रीमियम दरांमध्ये 1 जून 2022 पासून बदल. 7 वर्षांपूर्वी 2015 मध्ये दोन्ही योजना सुरू झाल्यापासून प्रीमियम दरांमध्ये प्रथमच बदल.
pmjjby and pmsby changes in premium rates
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजनांचा दीर्घकाळापासूनचा प्रतिकूल दाव्यांचा अनुभव लक्षात घेऊन आणि त्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी, योजनांचे प्रीमियम दर निश्चित करण्यात आले आहेत.
दोन्ही योजनांसाठी 1.25 रुपये प्रतिदिन प्रीमियम निश्चित करून योजनांचे प्रीमियम दर बदलले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेची प्रीमियम रक्कम 330 रुपये वरून 436 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेची रक्कम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आली.
या दोन योजनेच्या प्रीमियम दरामध्ये बदल
31.3.2022 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या सक्रिय सदस्यांची संख्या अनुक्रमे 6.4 कोटी आणि 22 कोटी आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना सुरु झाल्यापासून, 31.3.2022 पर्यंत अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांकडून प्रीमियम म्हणून 1,134 कोटी रुपये जमा झाले तर दाव्यांपोटी 1,134 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
pmjjby and pmsby changes in premium rates
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अंतर्गत 31.3.2022 पर्यंत अंमलबजावणी करणार्या विमा कंपन्यांनी 9,737 कोटी रुपये प्रीमियम गोळा केला आहे आणि दाव्यांचे 14,144 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.
दोन्ही योजनांअंतर्गत दावे थेट लाभ हस्तांतरण मार्गाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.