शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ऐवजी आता 5000 रुपये मिळणार | PM Kisan Mandhan Yojana

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा फायदा मिळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. तीन टप्प्यात दोन हजार रुपये असे या योजनेचे स्वरूप आहे.

आता दोन हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. याशिवाय, दोन हजार रुपयांच्या लाभासाठी पीएम किसान मानधन योजनेत नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन:

केंद्र सरकारच्या पीएम किसान मानधन योजनेंतर्गत वयाच्या साठीनंतर शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. (Farmers will now get Rs 5,000 instead of Rs 2,000 “PM Kisan Samman Nidhi Yojana”)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती नोंदणी करू शकणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना तीन हप्त्या मध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात.

या योजनेतील लाभार्थ्याच वय हे साठ वर्षाहून जास्त असेल आणि त्याने पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत नोंदणी केली असेल तर, त्याला प्रत्येक हप्त्यात अतिरिक्त तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आधी दोन हजारांचा हप्ता मिळायचा, तो आता पाच हजार रुपयांचा राहणार आहे.

 

या योजनेत नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.

  • आधार कार्ड
  • ओळख पत्र
  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बॅंक पासबुक
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईजचा एक फोटो

इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

पीएम किसान योजनेचे आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले असून, येत्या डिसेंबर महिन्यात दहावा हप्ता जमा होणार आहे.

Leave a Comment

close button