या 21 लाख शेतकऱ्यांना डिसेंबर चा हफ्ता मिळणार नाही | pm kisan yojana maharashtra update

ई-केवायसी पूर्ण न केल्याने डिसेंबरच्या हप्त्याला मुकणार : सोलापूरला सर्वाधिक

सरकार देतेय ना, मग घ्यायचे! पुढचे पुढे बघू या मानसिकतेतून राज्यातील लाखो शेतकरी केंद्र सरकारकडून वर्षाला मिळणाऱ्या ६ हजारांचे अनुदान आजवर लाटत आले.

मात्र, आता डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई-केवायसी असलेल्याच शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी राज्यातील तब्बल २१ लाख बनावट शेतकऱ्यांना दणका बसला आहे. यात सर्वाधिक १ लाख ७३ हजार बनावट शेतकरी सोलापूर जिल्ह्यात आहेत.

ई केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी जिल्ह्यानुसार पहा – येथे क्लिक करा

पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना ३१ मार्च २०१९ रोजी सुरू केली. याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजाराची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात प्रती २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जात आहे.

हे अनुदान थेट खात्यात जमा केले जात आहे. सुरुवातीला यात सरसकट अनुदान दिले जात होते. नंतर त्यात बदल करून शेती नावावर असलेले मात्र, प्राप्तिकर भरणारे, सरकारी कर्मचारी व अधिकारी, मोठे शेतकरी अशांना हे अनुदान मिळणार नाही, असे स्पष्ट केले गेले. त्यानुसार या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे.

ई केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी जिल्ह्यानुसार पहा – येथे क्लिक करा

Leave a Comment

close button