PM Kisan Yojana EKYC: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध आहेत. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM किसान सन्मान निधी) ही केंद्र सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे. याअंतर्गत सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपये देते.
पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15-30 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे. तुम्हीही याची आतुरतेनं वाट पाहत असाल, तर लगेच e-KYC पूर्ण करा. कारण, सरकारनं या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
PM Kisan Yojana EKYC
सरकारनं PM KISAN योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी e-KYC आधार अनिवार्य केलंय. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.
तसेच, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनंही हे साध्य करू शकता.
अशी करा PM Kisan Yojana KYC Process :-
- यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
- उजव्या बाजूला FARMER CORNER तुम्हाला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
- नंतर आपला मोबाईल नंबर टाकून OTP पाठवा आणि OTP आल्यावरOTP टाकून सबमिट करा.
- तुमची E-KYC पूर्ण झाली असेल