PM Kisan: जर खात्यात अजूनही आले नसतील 2000 रुपये तर हे काम करा, जाणून घ्या

PM Kisan: जर खात्यात अजूनही आले नसतील 2000 रुपये तर हे काम करा, जाणून घ्या – जर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, परंतु हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत खात्यात आले नसतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

PM Kisan Yojana Maharashtra

लाभार्थीची कागदपत्र पूर्ण नसल्याने किंवा आधार, बँक अकाऊंट नंबर आणि आयएफसी कोड चुकीचा असल्याने अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत. जर असे काही तुमच्या बाबतीत झाले असेल तर ताबडतोब चुक दुरूस्त करा, अन्यथा तुमच्या खात्यात पुढील हप्ता सुद्धा येणार नाही.

जाणून घ्या केव्हा येतो हप्ता?

शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये 3 हप्त्यात पाठवले जातात. दर 4 महिन्यात 2000 रुपयांचा हप्ता येतो. PM Kisan पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चच्या दरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यात येतो. तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो.

कोणत्या कारणामुळे अडकतात पैसे?

 • बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.
 • IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.
 • शेतकर्‍याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.
 • गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल
 • हप्ता न मिळाल्यास येथे करा तक्रार

PM Kisan Scheme Contact Number Maharashtra

PM Kisan Scheme योजनेच्या हप्त्याची माहिती घेण्यासाठी टोल फ्री नंबर 1800115526 वर कॉल करून तक्रार करू शकता. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रार, चौकशीसाठी हेल्पलाईन नंबर 155261 किंवा Toll Free नंबर 1800115526 वर सुद्धा कॉल करू शकता. तसचे कृषी मंत्रालयाकडून जारी नंबर 011-23381092 वर सुद्धा कॉल करू शकता.

 • मंत्रालयाशी असा करा संपर्क
 • PM Kisan टोल फ्री नंबर : 18001155266
 • पीएम किसान हेल्पलाईन नंबर :155261
 • PM Kisan लँडलाईन नंबर्स : 011्र23381092, 23382401
 • पीएम किसान नवीन हेल्पलाईन : 011-24300606
 • पीएम किसानची आणखी एक हेल्पालाईन : 0120-6025109

अशा प्रकारे चेक करा तुमच्या पैशांचे स्टेटस

 1. पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जा. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा.
 2. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा.
 3. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
 4. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा.
 5. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा.
 6. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

Leave a Comment

close button