PM Kisan Samman Nidhi Yojana Maharashtra पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 2000 रुपयांच्या ऐवजी 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना गिफ्ट देऊ शकते.
PM Kisan Samman Nidhi Yojana Maharashtra
रिपोर्टनुसार, केंद्र सरकार (Central Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी रकमेत दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांऐवजी तीन हप्त्यांमध्ये 12 हजार रुपये मिळू शकतात.
मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण सीतारमण यांची दिल्लीत भेट घेऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रक्कम दुप्पट करण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
कधी मिळतो हप्ता?
- पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये पाठविले जाते. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात.
- प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये पाठवले आहेत. दर 4 महिन्यांनी एक हप्ता येतो.
- PM Kisan ने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो.
- दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविला जातो.
- तर तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो.
2019 मध्ये ही योजना सुरु मोदी सरकारने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये देते.