PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये नक्की कोण पात्र आहे? या नवीन अटी समजून घ्या

मुंबई: शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) सुरू केली आहे ज्यामुळे सर्व लहान आणि सीमांत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना शेती आणि संबंधित उपक्रम तसेच घरगुती संबंधित विविध निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्न सहाय्य प्रदान करण्यात येईल. योजनेअंतर्गत, लक्ष्यित लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी संपूर्ण आर्थिक दायित्व भारत सरकारद्वारे उचलले जाईल.

या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन पात्रतेच्या व अपात्रतेच्या अटी जाणून घेणार आहोत. ही महत्त्वाची बातमी आपण जरुर शेअर करा. (pm kisan samman nidhi yojana new eligibility criteria)

 

पात्रता आणि अपात्रतेच्या अटी

 • या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी व त्यांची अल्पवयीन (१८ वर्षाखालील) मुले अशी आहे.
 • राज्य शासन आणि केंद्र शासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबांची ओळख पडताळणी करतील जे या योजनेंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील.
 • या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे.
 • खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.
 • सर्व संस्थात्मक जमीनधारक
 • खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधीत शेतकरी कुटुंब
 1. संवैधानिक पद धारण करणारे केलेले आजी व माजी व्यक्ती.
 2. सदस्य, आजी/माजी महानगरपालीकचे महापौर, आजी/माजी जिल्हा पराषदेचे अध्यक्ष.
 3. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/ कर्मचारी, चतुर्थ श्रेणी/ गट ड वर्ग कर्मचारी वगळून.
 4. सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. चतुर्थश्रेणी/ गट ड वर्ग कर्मचारी वगळून
 5. मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
 6. नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (CA), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

Leave a Comment