PM किसान योजनेंतर्गत २००० रु हफ्ता हवा असेल तर भौतिक तपासणी (PM Kisan Physical Verification ) करणे गरजेच आहे. त्यासाठी आता Physical Verification फोर्म भरून द्यावा लागणार आहे त्या विषयी सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
PM किसान योजना भौतिक तपासणी अटी व नियम खालीलप्रमाणे
- तपासणीचे वेळी लाभार्थीचे नावे भुमि अभिलेखामध्ये वहितीलायक क्षेत्र (हे.) फॉर्म मध्ये भरावे
- लाभाथीने भूमि अभिलेखामधील सदरचे क्षेत्र हे दि. ०१ फेब्रुवारी २०१९ पुर्वी धारण केलेले आहे काय ?
- योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती / पत्नी / १८ वर्षाखालील अपत्ये यापैकी एका पेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत काय ?
- लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी/केलेली आजी/माजी व्यक्ती आहे काय ?
- लाभार्थी आजी/माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालीकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत काय ?
- लाभार्थी केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी/कर्मचारी (चतुर्थ श्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून) आहे काय ?
- लाभार्थाने मागील वर्षात आयकर भरला आहे काय ?
- लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्यांचे मासिक निवृत्ती वेतन रु.१०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे काय ? (चतुर्थश्रेणी/गट ड वर्ग कर्मचारी वगळून)
- लाभार्थी नोंदणीकृत व्यवसायीक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ (आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती आहे काय
- लाभार्थी पीएम किसान योचनेचा लाभ सुरू असतांना मयत आहे काय ?
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड झेरोक्स
- बँक पासबुक झेरोक्स
- सातबारा उतारा झेरोक्स
- ८अ उतारा झेरोक्स
वरील कागदपत्रे फॉर्म सोबत जोडून आपल्या कृषी सेवकाकडे जमा करावीत.
‘PM Kisan Physical Verification fom Download PDF’ भौतिक तपासणी फॉर्म येथे क्लिक करा – DOWNLOAD HERE
फॉर्म कसा भरायचा खालील दिलेला video पहावा
भौतिक तपासणी का केली जात आहे?
बोगस शेतकरी शोधण्यासाठी भौतिक तपासणी केली जात आहे.
Physical Verification फॉर्म कुठे जमा करावा?
PM Kisan Physical Verification फॉर्म कृषी सेवकाकडे जमा करावा.