PM किसान योजना, या दिवशी जमा होणार 12 वा हफ्ता तारीख फिक्स | pm kisan next installment date 2022

pm kisan next installment date 2022 – केंद्र सरकारद्वारे PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा केले जातात. लवकरच या योजनेचा पुढील 12 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

PM Kisan next installment date 2022

PM Kisan Yojana 12th Installment: केंद्र सरकारद्वारे गरीब, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक PM किसान निधी योजना आहे. या अंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम ठराविक कालावधीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फायदा मिळणार नाही.

या योजनेंतर्गत रक्कमेचा पुढील 12 वा हफ्ता 17 October 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

“pm kisan next 12th installment date “

अशी करा ekyc ऑनलाईन

सर्वात प्रथम pm किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

येथे तुम्हाला खाली आल्यावर उजव्या बाजूला farmer corner मध्ये EKYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका व सर्चवर क्लिक करा.

आता आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर टाका.

पुढे ‘GET OTP’ वर क्लिक करा.

त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी टाका OTP व्हेरिफाय केल्यावर तुमची केवायसी पूर्ण होईल.

आधार कार्ड शी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमची e-kyc आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन करावी.

Leave a Comment

close button