ही आहे शेवटची तारीख pm kisan kyc last date 2022

By Shubham Pawar

Published on:

PM Kisan KYC Last date in Marathi 2022 जिल्ह्यात पीएम -किसान योजनेत 2 लाख 16 हजार 93 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाग 85 हजार शेतकन्यांच्या खात्यावर ११ हप्ते जमा झाले अहेत. ज्या शेतकऱ्यांना या योजनेत लाभ मिळतो, त्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिले आहेत.

पीएम किसान योजनेत दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. यात अनेकांची रक्कम चुकीच्या खात्यावर अथवा अपात्र लाभार्थ्यांकडे जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. शिवाय मयताच्या नावावरही लाभ घेतला जाऊ शकतो, हे लक्षात आल्याने या निर्णयाचे संकेत देण्यात येत आहेत.

PM Kisan KYC Last date in Marathi 2022

31 जुलै 2022 पर्यंत केवासी पूर्ण करण्याचे संकेत प्राप्त झाले असले तरीही तशा स्पष्ट सूचना प्रशासनास नसल्याने यातच वेळ निघून जाण्याची भीती आहे. कोरोनाचा कहर वाढला तर ही केवायसी करण्यातही अडचणी वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

  • जिल्ह्यात नोंदणी केलेल्या २.१६ लाखकी १ लाख ८५ हजार ९११ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हप्ते जमा झाले आहेत. यापैकी ३२ जणांचा उपविभागही कळाला नाही.
  • जिल्ह्यात २५ हजार २९० शेतकयांच्या खात्यावर ११ पेक्षा कमी हप्ते जमा झाले आहेत. तर ४८९२ शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. शेतकयांनी सुरुवातीला पीएमकिसानडॉटजीओव्ही या संकेतस्थळावर जावे. त्या ठिकाणी ई-केवायसीचा पर्याय निवडावा. त्यात आपला आधार क्रमांक आणि

-आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाइल नंबर सबमिट लिकरावा. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करावयाचे आहे. सबमिट केल्यानंतर केवायसी पूर्ण झाले, असा संदेश पोर्टलवर दिसेल केवायसीसाठी प्रशासनाकडे अद्याप स्पष्ट आदेश आले नसले तरीही ३१ जुलै पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. यातून बोगस लाभार्याना लाभ मिळू नये, हा उद्देश समोर ठेवला असला तरीही शेतकयांची कटकट वाढणार आहे.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment