PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली, ही आहे शेवटची तारीख | pm kisan kyc last date extended

PM Kisan KYC Last Date Extended – शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षांखालील अपत्ये) रु. 2,000/- प्रती हप्ता या प्रमाणे 3 हप्त्यात रु. 6,000/- प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येत आहे.

pm kisan kyc last date 2022

Today, under this scheme, a total amount of Rs. 18151.70 crore profit has been paid. The benefit to be given to these beneficiaries should be easily paid.

Therefore, the Central Government had directed the beneficiaries of the Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi (PM KISAN) scheme to complete their e-KYC verification before May 31, 2022. However, the Central Government has now extended the deadline till July 31, 2022, to complete the e-KYC verification.

आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील 109.46लाख लाभार्थ्यांना एकुण रक्कम रू. 18151.70कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरत्या अदा करता यावा.

म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC पडताळणी दिनांक 31 मे, 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तथापी, सदरची e-KYC पडताळणी पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने आता दिनांक 31 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली ही आहे शेवटची तारीख

लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत e-KYC पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या दोनपैकी स्वतःच्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची e-KYC पडताळणी करता येईल.

पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंक द्वारे e-KYC करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणान्या OTP आधारे स्वतःचे e-KYC पडताळणी करता येईल.

pm kisan kyc last date extended

यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभार्थी biometric पद्धतीद्वारे e-KYC पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रू. 15/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येईल.

राज्यात दिनांक 26 मे 2022 अखेर एकूण 52.82 लाख लाभार्थ्याचे e-KYC पडताळणी पुर्ण करण्यात आली आहे.

उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वतः अथवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे e-KYC पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक 31 जुलै 2022 मुदतीपूर्वी पुर्ण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

close button