PM Kisan 13th Installment: मित्रांनो, केंद्र सरकारची शेतकर्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना असलेली पंतप्रधान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत शेतकर्यांना 2 हजार रुपयांचे 12 हप्ते वितरीत करण्यात आले असून, आता 13 वा हप्ता (PM Kisan 13th Installment) लवकरच वितरीत केला जाणार आहे.
तर त्याआधी पीएम किसान योजनेची पात्र – अपात्र लाभार्थी यादी तुमच्या मोबाईल मध्ये कशाप्रकारे चेक करता येईल, हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेऊयात.
PM Kisan 13th Installment List
मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत 10 व्या हप्त्यापासून अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहत, ज्यामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थी शेतकर्यांना पीएम किसान योजनेची केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. तसेच केवायसी झाल्यानंतर लाभार्थ्यांचे पेमेंट मोड Aadhar झाल्याने खात्यात पैसे येण्यासाठी शेतकर्यांना बचत खात्याला आधार क्रमांक लिंक करणेसुद्धा अनिवार्य करण्यात आले. PM Kisan 13th Installment
✔️ 13 व्या हप्त्याआधी करा हे महत्त्वाचे काम, तरच मिळेल पीएम किसानचा पुढील हप्ता
पीएम किसान केवायसी केल्यानंतर या योजनेतून पात्र – अपात्र लाभार्थ्यांची ओळख करणे सोपे झाले आहे. त्यामुळे केवायसी झाल्यानंतर लाभार्थी अपात्र ठरला असेल तर तो योजनेतून बाद करण्यात आला आहे आणि आता 13 व्या हप्त्याआधी (PM Kisan 13th Installment) अपात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे.
अशी पहा पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी
तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील Google Chrome ब्राउजर मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन करून घ्यावी. जी आहे – https://pmkisan.gov.in/
- पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर ‘Farmers Corner’ या सदराखाली 6 व्या क्रमांकावर “BENIFICIARY LIST” हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करावे.
- “BENIFICIARY LIST” या पर्यायावर क्लिक केल्यावर आता तुम्हाला ज्या गावातील पात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल ते गाव निवडावे लागेल.
- त्यासाठी सर्वप्रथम तुमचे राज्य, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून खाली “Get Report” या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या गावातील पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल.
या यादीत नाव असलेल्या लाभार्थी शेतकर्यांनी जर आपली केवायसी केली असेल, बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असेल आणि त्यांना Land Seeding चा प्रॉब्लेम आला नसेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता {PM Kisan 13th Installment} मिळण्यात कोणतीही अडचण जाणार नाही.
📢 मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र 2023 सविस्तर माहिती 👉 येथे क्लिक करून पहा
अशी पहा अपात्र लाभार्थ्यांची यादी
मित्रांनो, आता पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी कशी पहावी? हे जाणून घेऊयात.
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील Google Chrome ब्राउजर मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन करून घ्यावी. जी आहे – https://pmkisan.gov.in/
- पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर PAYMENT SUCCESS या सदराखाली Dashboard चा ऑप्शन दिसेल. भारताचा नकाशा जिथे दिसेल, त्याच्या वर Dashboard हा पर्याय दिसेल.
- Dashboard या पर्यायावर क्लिक करावे, त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला ज्या गावातील अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल ते गाव निवडावे लागेल.
- त्यासाठी सर्वप्रथम तुमचे राज्य, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून पुढील “Submit” या बटणावर क्लिक करावे.
- Submit केल्यावर आता तुम्हाला त्या गावचा संपूर्ण Dashboard दिसेल. त्यापैकी “Aadhaar Authentication Status” या पर्यायावर क्लिक करावे.
- “Aadhaar Authentication Status” या पर्यायाखाली आता तुम्हाला त्या गावातील “Total Ineligible” या टेबल मध्ये पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल.
- ज्यांचे नाव या यादीत असतील त्यांना 13 वा हप्ता (PM Kisan 13th Installment) मिळणार नाही.
तर मित्रांनो अशाप्रकारे तुम्ही तुमच्या गावातील पीएम किसान योजनेतील पात्र – अपात्र लाभार्थ्यांची यादी तुमच्या मोबाईल वर पाहू शकता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या https://marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.