पीक विमा भरताना घ्यावयाची काळजी व महत्वाच्या सूचना नक्की वाचा | Pik Vima Yojana important instruction Notice

By Shubham Pawar

Published on:

पीक विमा खरीप- 2022 भारतीय कृषी विमामार्फत पीक विम्याबद्दल महत्वाची ऑनलाइन मिटिंग पार पडली या बैठकीमध्ये विमा भरताना घ्यावयाची काळजी तसेच महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

पीक विमा भरताना घ्यावयाची काळजी

त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे
👇👇👇

  1. विमा भरताना 7/12 किंवा ८ अ अपलोड करणे अनिवार्य आहे 7/12 किंवा ८ अ हा महाभुलेख/डिजिटल/तलाठी कोणताही चालेल.
  2. भाडेकरार वर जमीन घेतली असेल तर संमती पत्रासाठी 100 रु. चा बॉण्ड आवश्यक आहे
  3. मयत शेतकऱ्याचा फॉर्म भरता येणार नाही
  4. आधार कार्ड असेल तरच विमा भरता येईल
  5. महसुल मंडल बरोबर आहे का एकदा चेक करावा
  6. फ्रॉम भरताना शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टकावा CSC धारकाने आपला मोबाईल नंबर टाकू नये
  7. 👉🏻 Mix cropping हा ऑप्शन फक्त जे शेतकरी मिश्र पीक घेत असतील तर सिलेक्ट करा. मिक्स क्रॉप म्हणजेच ( उदाहरण – सोयाबीन मध्ये तुम्ही जर मूग, चवळी, उडीद लावले तर याला म्हणायचं मिश्र पीक )
  8. खालील Documents अपलोड करावे
  • बँक पासबुक यावस्तीत प्रिंटिंग पाहिजे ( हाताने लिहिले अकाउंट नंबर व नाव असेल तर घेऊ नका ते चालत नाही)
  • ७/१२ किंवा ८ अ
  • संमती पत्र ( सामाईक शे‌त्र असेल तर संमती प्रत्र अपलोड करा)
  • भाडेकरार वर जमीन घेतली असेल तर संमती पत्र अपलोड करावे यासाठी 100 रु. चा बॉण्ड पेपर आवश्यक आहे.

Pik Vima Yojana important Notice

  1. आधार कार्ड,बँक पासबुक ,७/१२ या तीन doc वर नाव बरोबर पाहिजे
  2. Mix cropping ऑप्शन मध्ये म्हणेच शेतकरी मिश्र पीक घेत असेल तरच तो पर्याय निवडावा व रेशो नीट टाकावा
  3. पिक निवडताना काळजी पूर्वक निवडावे
  4. Unpaid मध्ये पावती न ठेवता payment करुन पावती काढावे
  5. पोर्टल वरून पावती निघाल्यानंतर विमा कॅन्सल करता येणार नाही
  6. शेतकऱ्याचे नाव, गट नं, Account नंबर व IFSC code , पिकाचे नाव ,महसूल मडल,गाव चेक करून फ्रॉम सबमिट करा
  7. पिक पाहणी करणे अनिवार्य आहे (विमा भरल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पीक पाहणी करणे अनिवार्य आहे)

बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या पीक विमा अर्ज नोंदणी प्रक्रियेसंदर्भात आपले सरकार सुविधा केंद्र (CSC) चालकांसाठी सूचना.

काय करावे :

  1.  सर्व केंद्रचालकांनी त्यांच्या केंद्राच्या समोर योजनेची प्रसिद्धी करणारे पोस्टर प्रदर्शित करावेत. तसेच पीकनिहाय विमा हप्ता आणि विमा संरक्षित रकमेचा तपशील प्रदर्शित करावा.
  2. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक योग्य प्रद्धतीने आणि पूर्ण अंकी असावा. बँकेच्या कागदपत्रांवर IFSC कोड असावा. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पासबुकवर पूर्ण बारा अंकी खाते क्रमांक असावा.
  3. अर्जदाराच्या आधारकार्डावरील नावात आणि कागदपत्रांवरील नावात फरक असल्यास त्या ठिकाणी अर्जदारांकडून व्यक्ती एकच असल्याचा खात्रीशीर पुरावा सादर करावा.
  4. अर्जासोबत जोडलेली आणि ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट तसेच सहज पाहता येतील अशी असावीत. अर्ज भरताना जमिनींच्या कागदपत्रांवरील नोंदवलेले क्षेत्र तपासून घ्यावे. विमा क्षेत्र हे केवळ हेक्टरमध्ये नोंदवावे. एकरमधील अथवा ५) अन्य युनिटमधील क्षेत्र हेक्टरमध्ये रुपांतरीत करावे.
  5. अर्ज भरताना जमिनीच्या कागदपत्रांवरील गावाचे नाव आणि अर्जातील गावाचे नाव तसेच महसूल मंडळ एकच असल्याची खात्री करून घ्यावी. जमीन कागदोपत्री मयत खातेदायाचा नावे असल्यास इतर कोणतीही व्यक्ती विमा अर्ज करण्यास पात्र नाही.
  6. सामायिक जमीन असेल तर अर्जदाराला इतर खातेदारांचे खात्रीशीर पुराव्यानिशी संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. करून घ्यावा. जमीन कागदोपत्री मयत खातेदायाचा नाव असल्यास इतर कोणतीही व्यक्ती विमा अर्ज करण्यास पात्र नाही.

काय करू नये

  • १) अर्ज करावयास आलेल्या शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्त्याशिवाय कोणतीही अन्य रक्कम आकारू नये. असे आढळून आल्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपले सरकार सुविधा केंद्राचे लायसन्स रद्द होऊ शकते तसेच कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • २) कर्जदार अर्थात बँका किंवा वित्तीय संस्थांकडून अधिसूचित पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा अर्ज भरून घेऊ नये.
  • ३) शेतजमिनीच्या कागदपत्रांवरील नोंदवलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा अर्ज भरून घेऊ नये.
  • ४) एकाच सर्व्हे नंबरवरील अनेक पीक विमा अर्ज भरू नये. असे अर्ज रद्द करून विमा हप्ता जप्त करण्यात येतो.
  • (५) जमिनीचा सर्व्हे नंबर जमीन कागदपत्र सातबाराप्रमाणे बिनचूक असला पाहिजे. जमिनीच्या कागदपत्रांवरील नोंदीपेक्षा – जास्त क्षेत्राचा विमा अर्ज भरून घेऊ नये.
  • ६) जमिनीचे कागदपत्र (सातबारा) आणि अर्ज यामधील धारण केलेल्या क्षेत्राच्या तपशीलात कोणताही फरक नसावा.
  • ७) व्यापारी संस्था अथवा ट्रस्ट यांच्या नावे पीक विमा अर्ज स्वीकारू नये,
  • ८) अर्जदाराने अन्य ठिकाणी पीक विमा अर्ज भरलेला असल्यास त्याचा अर्ज भरून घेऊ नये.

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

2 thoughts on “पीक विमा भरताना घ्यावयाची काळजी व महत्वाच्या सूचना नक्की वाचा | Pik Vima Yojana important instruction Notice”

  1. Pik Vima Tr Khup Bharle HAe CSC Through ..Pn aat Next Kay Karayche Te Savistar Sanga ..Karan Dar Veles Vima Bhartaat Shetkari Ani Tyan kahi Mahiti Naste Samor Kay Karayche .. Tumhi Ek Video Banva Yavar Shubham Bhau ….

    Reply
    • Pratek video banvla jato aapn pahat nahi aani prash vichart nahi… Form bharlayvr to rejected hotoy ka accept hotoy he pahane garjech aahe… Form rejected zhala tar je documents required aahet te upload karave … Form accept zhala tar ek laksht thevayche aahe jevha kadhi shetache nuksan hil tevha 72 taschya aata mfhe xrop insurance app download karun tya mahf eclaim takava… Nantr agent ghari yeyun check karto anai mag nuksan bharpai mikte… Crop insurance app mdhun 60% lok claim ch takat nahit.. mg paise kase milnar

      Reply

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!