नांदेड: प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी जमा होणारा विमा मिळण्यास विलंब झाला होता. परंतु आता सोमवारपासून विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.
जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी होवून पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मुग, खरीप ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नदीकाठचा भाग तसेच सखल भागातील जमिनीमध्ये पाणी साचून पिके नष्ट झाली होती. (The good news for farmers is getting crop insurance)
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या १३४ टक्के पावसाची नोंद झाली. दाम्यान जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नऊ लाख दहा हजार शेतकन्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पिक विमा भरला होता सुरूवातीला पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे नुकसानीचे प्रमाण अधिक होते. pik vima yadi maharashtra
यामुळे भरपाईसाठी शेतकऱ्यांनी चार लाखाच्या जवळ नुकसानीबाबत दावे दाखल झाले होते. याबाबत विमा कंपनीकडून सर्वेचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी वेळोवेळी कंपनी प्रतिनिधींशी समन्वय साधून शेतकऱ्यांना वेळेत विमा मंजूरीसाठी पाठपुरावा केला होता.
यामुळे राज्यात सर्वाधिक ४६१ कोटींचा विमा परतावा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला होता. जिल्ह्याला मंजूर झालेल्या विमा शेतकऱ्यांना त्वरित द्यावा असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही दिले होते. दरम्यान दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना ४६१ कोटी रुपयांचा मंजूर विमा शेतकऱ्यांना मिळावा असे नियोजन होते.
विमा परतावा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता. परंतु देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी विमा जमा करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. यानंतर बँकेला सुट्या आल्या. यामुळे सोमवारपासून विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विमा परतावानुसार राज्य शासनाची ४५५ कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी होत आहे.
तालुकानिहाय पीक विमा मंजूर:
तालुका – शेतकरी संख्या – मंजूर परतावा
- अर्धापूर – 21763 – 18.81 कोटी
- भोकर – 38081 – 25.25 कोटी
- बिलोली – 47760 – 32.76 कोटी
- देगलूर – 60303 – 38.04 कोटी
- धर्माबाद – 23651 – 19.45 कोटी
- हदगाव – 66074 – 61.62 कोटी
- हिमायतनगर – 19477 – 15.12 कोटी
- कंधार – 91079 – 41.77 कोटी
- किनवट – 11083 – 5.69 कोटी
- लोहा – 95347 – 53.04 कोटी
- माहूर – 10211 – 9.50 कोटी
- मुदखेड – 21286 – 14.31 कोटी
- मुखेड – 104697 – 50.03 कोटी
- नायगाव – 62071 – 40.99 कोटी
- नांदेड – 36720 – 19.53 कोटी
- उमरी – 26199 – 14.19 कोटी
एकूण=735811=461.09 कोटी
2तारीख पासून ka