Pik Nuksan Bharpai Maharashtra 2022: राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे एनडीआरएफच्या (NDRF) निकषांची वाट न पाहता ठाकरे सरकारकडून ही तात्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
या वर्षी पावसाळ्याने जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात धूम मचावली यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. तर यासाठी शेतकऱ्यांना एक मदत हवी होती. ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे.
आपण या लेखामध्ये पॅकेज बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही महत्त्वाची माहिती पुढे नक्की शेअर करा. ही मदत कशी राहील हे पण आपण जाणून घेणार आहोत.
नुकसान भरपाई साठी दहा हजार कोटीचा निधी
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2022 या काळात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांनी नियोजित सर्व दौरे रद्द करून तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला.
तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला अधिकची मदत देण्यात यावी अशी मागणी केली. Pik Nuksan Bharpai Maharashtra
Pik Nuksan Bharpai Maharashtra 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2022पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.
या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘Pik Nuksan Bharpai Yadi’
नुकसान भरपाई अनुदान
महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2022 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामध्ये 55 लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्र बाधित झाले होते तसेच शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर यासाठी हे अर्थसहाय्य जाहीर केले आहे.
राज्य सरकारने 10 हजार कोटीचा पॅकेज तर जाहिर केले आहे परंतु जिरायती साठी, बागायती साठी आणि बहुवार्षिक पिकांकरिता कसा निधी देणार आहेत. हे पुढीलप्रमाणे दिलेले आहे.
- जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे.
- बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे.
- बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे.
नोट : ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे. असे स्पष्टपणे सांगितले आहे.
यामध्ये जिरायती साठी केंद्र सरकारचे सहा हजार 800 रुपयांच्या मदतीचे निकष असले तरी राज्य सरकारने यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
अशा प्रकारे 10 हजार कोटींच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. Pik Nuksan Bharpai List 2022 Maharashtra
https://www.youtube.com/watch?v=1aEVeRfwvr8