उद्योग व्यवसायांना 90% कर्ज अर्ज सुरु | पशुपालन व दुग्ध व्यवसाय साठी पशुसंवर्धन योजना

केंद्र शासनाने सन २०२०-२१ या वर्षापासून पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नविन योजनस मंजूरी प्रदान केली असून, सन २०२२ या वर्षात सदर योजनेकरिता रूपये १५ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

सदर योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया (आईस्क्रिम, चीज निर्मिती, दूध पाश्चराईजेशन, दूध पावडर, इत्यादी), मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये ३ टक्के सुट देण्यात येणार आहे.

येथे क्लिक करा »  सोलर रुफटॉप योजना ऑनलाईन अर्ज | How to Apply for Solar Rooftop Subsidy in Maharashtra
pashusavardhan karj yojana
pashusavardhan-karj-yojana

योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर (http://dahd.nic.in/ahdf) उपलब्ध आहे.

सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

या विभागाच्या संकेतस्थळावर (http://ahd.maharashtra.gov.in) लिंक देण्यात आलेली असून, या योजनेच्या मार्गदर्शक सुचना मराठीत प्रसिध्द करण्यात येत आहेत.

येथे क्लिक करा »  Shahu Maharaj Quotes in Marathi, जयंती शुभेच्छा that you can share with your family and friends

केंद्र शासनाने वर नमुद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केलेला आहे.

सदर योजनेचा व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल.

राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी उपयुक्त असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सचिन्द्र प्रताप सिंह (भा.प्र.से.) आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

close button
Scroll to Top