३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज | पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2022

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या नावाने दि.1.5.1999 पासून सुधारित केल्याप्रमाणे कार्यान्वित आहे.

कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतलाय.

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला, तरच शेतीसंदर्भात नियोजन करणे सोयीचे होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

त्यासाठी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार असल्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्यात.

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2022

प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खाजगी बॅका पतसंस्थेच्या ज्या सदस्यांनी रु.1 लाख किंवा त्यापेक्षा कमी पीक कर्ज घेतले आहे.

त्याची व्याजासह परतफेड प्रत्येक वर्षाच्या दि.30 जून अखेरपर्यन्त केली असेल त्या सदस्यास कर्जाच्या मुद्दल रकमेवर 3% प्रोत्साहनाचा लाभ मिळेल.

रु. 1 लाख पेक्षा जास्त ते रु. 3 लाख पर्यंतच्या कर्जाची वेळेत परत फेड करणा-या शेतक-यांना 2% सवलत मिळत असे, तथापि या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

शासन निर्णय क्र. सी.सी.आर.-0612/प्र.क्र.269/2-स, दिनांक 3.12.2012 अन्वये सुधारणा करण्यात आली असून सुधारित योजनेनुसार

रु.1 लाख पर्यंत पीक कर्जाच्या परतफेडीवर 3 टक्के व त्यापुढील परंतू रु. 3 लाख पर्यंतच्या पीक कर्जाच्या परतफेडीवर आता 2 टक्के ऐवजी 1 टक्का व्याज अनुदान देण्यात येते.

सुधारित योजनेनुसार वर्ष 2018-19 या वित्तीय वर्षापासून वाटप झालेल्या पीक कर्जाच्या वसुलीवर व्याज अनूदान वितरीत करण्यात येईल.

ही योजना प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खाजगी बॅकांनी दिलेल्या पीक कर्जाला देखील लागू करण्यात आली आहे.

शेतकर्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी

  • राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली.
  • त्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते.
  • मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलंय.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

{अर्ज डाउनलोड} शरद पवार ग्राम समृद्धी योजना Form

 

Leave a Comment

close button