पॅन कार्ड क्लब लिमिटेड गुंतवलेले पैसे परत मिळणार लगेच अर्ज करा | Pan Card Club Limited Online Apply

Pan Card Club Limited Online Apply – 09 सप्टेंबर 2022 रोजी दी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई यांनी पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडच्या कॉर्पोरेट नादारी निर्णय प्रक्रियेचा प्रारंभाचा आदेश दिला आहे.

Pan Card Club Limited Online Apply

पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे पुराव्यासह आपले दावे 10/12/2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. किंवा पूर्वी नोंद क्र. 10 समोर नोंदविलेल्या पत्त्यावर अंतरिम निर्णय व्यावसायिकाकडे सादर करण्यास सांगण्यात येत आहे. अन्य सर्व धनको पुराव्यासह आपले दावे व्यक्तिशः, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारा सादर करू शकतात.

नोंद क्र. 12 मध्ये सूचिबद्ध केल्याप्रमाणे विवक्षित संवर्गातील वित्तीय धनकोने प्रपत्र सीएमध्ये संवर्गाचा (वित्तीय गुंतवणूकदार) प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करण्याकरिता नोंद क्र. 13 मध्ये सूचिबद्ध केलेल्या तीन नादारी व्यावसायिकांपैकी त्यांच्या पसंतीचा प्राधिकृत प्रतिनिधी निर्देशित करावा. {Pan Card Club Limited Online Apply}

दाव्याचे बनावट किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंड करण्यात येईल. गुंतवणूकदार, PCL. आपणांस कळविण्यात येत आहे कीं, पॅनकार्ड क्लब लिमिटेडच्या परताव्याची प्रक्रिया न्यायालयाकडून सुरू करण्यात आली असून त्याबद्दल सविस्तर नोटिस 12 सप्टेंबर 2022 च्या लोकसत्ता मध्ये आलेली आहे.

पॅन कार्ड क्लब लिमिटेड (National Company Law Tribunal) कोर्टाने त्या करिता IRP (The Insolvency Resolution Process) ची नेमणूक केली असून,

PCL च्या सर्व गुंतवणूकदाराना आपली गुंतवणूक व केवायसी कागदपत्रे

 1. आधार कार्ड झेरॉक्स
 2. पॅन कार्ड झेरॉक्स
 3. कॅन्सल चेक किंवा पासबुक पहिल्यापानाची झेरॉक्स
 4. मॅच्युरीटी डेट पासून 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट्स झेरॉक्स (option)
 5. मेंबर सर्टिफिकेटस
 6. ACK रीसीट (Option)
 7. मेंम्बरशीप पावती (option)
ऑनलाईन अर्ज येथे करा - Web Link - pclcirp.dcirrus.co

या वेबसाईटवर स्कॅन करून (Last Date) दिनांक 10/12/2022 पुर्वी पाठवायची आहेत. या बाबतीत मा. कोर्टाचा निकाल सर्वांना बंधनकारक आहे. सर्व PCL च्या गुंतवणूकदारानी वैयक्तिक जबाबदारीने, सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी.

तुमचे प्रश्न आणि आमची उत्तरे 

अर्ज करण्यापूर्वी सर्वसामान्य मार्केटिंग पर्सन तसेच लोकांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न व त्यांची समर्पक उत्तरे :

१) पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीत भरलेले पैसे परत मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना आम्हाला कोणती कागदपत्रे लागतील?

> लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

अ) पॅनकार्ड किवा आधारकार्ड किवा वोटर आयडी किवा पासपोर्ट ह्या पैकी एकाची स्कॅन कॉपी.

ब) मेंबरशिप सर्टिफिकेट, किंवा पैसे भरल्याची पावती किंवा ACK ( acknowledgement slip) ची पावती किंवा मॅच्युरिटीचा दिलेला चेक किंवा बाऊन्स झालेला चेक तसेच ईतर काही पुरावा असल्यास त्यांच्या स्कॅन कॉपी.

क) बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो, किंवा कॅन्सल चेक ची स्कॅन कॉपी. जेणेकरून तुम्हाला पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनी कडून तुम्ही गुंतवलेले पैसे परत आले नाही हे स्पष्ट होईल.

ड) जर तुम्ही चेक पेमेंट केले असेल तर तुमच्या सर्टिफिकेट वर जी चेक भरल्याची तारीख आहे त्या तारखेपासून ज्या दिवशी तुम्ही दिलेला चेक पॅनकार्ड क्लब लिमिटेड च्या नावाने क्लियर झाल्याची एंट्री तुमच्या पासबूकच्या ज्या पानावर आहे त्या पानाची तसेच त्या पासबूकच्या पहिल्या पानाची एकत्र झेरॉक्स अथवा बँक स्टेटमेंट ची स्कॅन कॉपी द्यावी

इ) तुमच्या सर्टिफिकेट वर जी मॅच्युरिटीची डेट आहे त्या डेट पासून पुढील एक महिन्या भरातील ज्या एंट्रीज तुमच्या पासबूक वर असतील त्या पानाची झेरॉक्स अथवा बँक स्टेटमेंट ची स्कॅन कॉपी हवी. जेणेकरून तुम्हाला पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनी कडून तुम्ही गुंतवलेले पैसे परत आले नाही हे स्पष्ट होईल.

टीप :- पॉइंट नंबर ड) व पॉइंट नंबर इ) जर सध्या उपलब्ध नसतील तर त्या व्यतिरिक्त जी कागदपत्रे तुमच्या जवळ आहेत ती सादर करून क्लेम सबमिट करावा.

२) ज्यांनी पॉलिसी सबमिट केल्या आहेत किंवा त्यांची पावती हरवली आहे किंवा त्यावरील प्रिंट केलेल दिसत नसेल तर त्यांनी काय करावे?

ज्या लोकांनी पॉलिसी सर्टिफिकेट जमा केली आहे त्या लोकांनी त्यांना मिळालेल्या ACK (acknowledgement slip) कॉपीची, मॅच्युरिटी चेक मिळालेला असल्यास त्याची, बाऊन्स चेक असल्यास त्याची स्कॅन कॉपी करून अपलोड करायची आहे. जर पावती हरवली असेल किंवा प्रिंट गेलेली असल्यास फोलिओ नंबर च्या आधारे १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपर वर एक affidavit बनवून त्याची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. तसेच एका ACK (acknowledgement slip) वर अनेक फोलिओ नंबर असतील तर अशावेळी क्लेम सादर करताना त्या ACK (acknowledgement slip) वर जेव्हढे फोलिओ नंबर असतील तितक्या झेरॉक्स कॉपी काढून प्रत्येक क्लाईंट नुसार त्याचा फोलिओला हायलाइट करून क्लेम सादर करावा.

३) जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला असेल तर त्या केस मधे काय करता येईल?

अशा केस मधे त्यांच्या नॉमिनीने, ज्यांचा उल्लेख त्या सर्टिफिकेट मध्ये नॉमिनी म्हणून आहे त्यांनीच तो क्लेम करायचा आहे. क्लेम करताना क्लेम फॉर्म मधे नाव व पत्ता हा मृत अर्जदारचा असेल, मात्र बँकेचे डिटेल्स ही नॉमिनीचे असतील. तसेच मुद्दा क्र. १९ नंतर असलेल्या कॉलम मधे कॅपिटल अक्षरात नॉमिनीने स्वतःचे नाव लिहायचे आहे. आणि हा अर्ज कोण करत आहे या कॉलम मध्ये “नॉमिनी” म्हणून लिहायचे आहे. सोबत पुरावा म्हणून पॉलिसीधारकाच्या डेथ सर्टिफिकेटची स्कॅन कॉपी अदर अटॅचमेंट मध्ये अपलोड करायची आहे

४) ज्या पॉलिसीधारकांनी आरडी (Divine ) चे पैसे भरलेले आहेत. त्यातील काही जणांना सर्टिफिकेटही मिळाले नाही तर काही जणांची आरडीही अर्धवट राहिलेली आहे त्यांचे काय?

डिवाइन मेंबरशिप मध्ये ज्यांनी पैसे भरले आहेत पण सर्टिफिकेट मिळाले नाही अशाने शेवटचा हप्ता भरलेल्या रिसिप्टची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. आणि जर का कोणाची अर्धवट राहिली आहे तर त्यानेही शेवटचा भरलेल्या हप्त्याची रिसिप्ट स्कॅन करून त्याची कॉपी अपलोड करायची आहे. त्यात कंपनीच्या नियमाप्रमाणे जी रक्कम भरली असेल तितकीच रक्कम क्लेम अमाऊंट मधे भरावी.

५) ज्या गुंतवणूकदार मुलीचे लग्न झाले आहे व त्यांची नावे चेंज झाली आहेत त्यांचे काय?

ज्या गुंतवणूकदार मुलीचे लग्न झाले आहे अशा मुलीने क्लेम फॉर्म भरताना त्या फॉर्म मध्ये तिची लग्न झाल्यानंतरची संपूर्ण माहिती भरावी व सोबत तिच्या लग्ना नंतर बदल करून घेतलेली डॉक्युमेंट्स तसेच मॅरेज सर्टिफिकेट ची कॉपी स्कॅन कॉपी अदर अटॅचमेंट मध्ये अपलोड करायची आहे.

६) मी मार्केटिंग पर्सन आहे आणि मी गुंतवणूकदाराला त्याने पॅनकार्ड मध्ये भरलेले पैसे माझ्याकडून परत केले असतील तर मला माझे पैसे कसे परत मिळवता येतील ? अश्या केसेस मध्ये क्लेम कोणी आणि कसा करावा?

या केस मध्ये मार्केटिंग पर्सननेने दिलेली रक्कम तो स्वतः क्लेम करू शकतो. पण त्यासाठी त्या मार्केटिंग पर्सन कडे पैसे देताना गुंतवणूकदारा कडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर एफिडेविट असे लिहून घेतलेले असावे की त्याला त्याने पॅनकार्ड कंप गुंतवलेले पैसे त्या मार्केटिंग पर्सन कडून मिळाले आहेत व भविष्यात जेव्हा पॅनकार्ड कंपनीकडून पैसे मिळतील तेव्हा ते पैसे त्या मार्केटिंग पर्सन ने क्लेम करून घ्यावे. त्याला माझी काहीही हरकत नसणार. फॉर्म भरून झाल्यावर त्या स्टंप पेपरची स्कॅन कॉपी अदर अटॅचमेंट मध्ये अपलोड करायची आहे..

७. ज्यांची मॅच्युरिटी डेट बाकी आहे त्यांचे काय? अशा केस मधे त्यांनी सुद्धा न चुकता क्लेम फॉर्म भरायचा आहे.

८) अर्जदार आणि नॉमिनी या दोघांचा हि जर मृत्यू झाला असेल तर क्लेम करण्याची काय प्रोसिजर काय आहे?

या केस मधे अर्जदारच्या सर्वात जवळचा नातेवाईक (वारस) हा क्लेम करू शकतो. त्याचबरोबर त्याला “Legal heir certificate” म्हणजेच कायदेशीर वारसा प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसेच अर्जदार व नॉमिनी या दोघांच्या मृत्यूचा दाखला आणि कायदेशीर वारसा प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी बनवून अदर अटॅचमेंट मधे अपलोड करावी लागेल तरच तो क्लेम ग्राह्य धरला जाईल.

९) एका व्यक्तीच्या एका पेक्षा अधिक गुंतवणुकी (सर्टिफिकेट) असतील तर त्या एकाच फॉर्ममध्ये सगळ्या एंट्री करु शकतात का? हो असेल तर कश्या?

हो. एका क्लेम फॉर्म मधे एक गुंतवणूकदार त्याची अनेक सर्टिफिकेट एकत्र करून अर्ज करू शकतो. असा अर्ज करताना त्याला त्याची सर्व सर्टिफिकेट मधील भरलेल्या रकमेची बेरीज करून प्रिन्सिपल अमाऊंट या कॉलम मधे भरायची आहे. तसेच त्याचा सर्व सर्टिफिकेट मधील मुदती अंती मिळणाऱ्या रकमेची बेरीज करून ती रक्कम टोटल क्लेम अमाऊंट आणि सरेंडर वॅल्यू या दोन्ही कॉलम मधे सेम भरायची आहे. मात्र सर्टिफिकेट अपलोड करताना हि सर्व सर्टिफिकेट एकाच फाइल मधे स्कॅन करून त्याची एक पीडीएफ कॉपी बनवून नंतर मेंबरशिप सर्टिफिकेट ऑप्शन मधे अपलोड करावी लागतील.

१०) अनेक सर्टिफिकेट असतील तर मॅच्युरिटी डेट च्या कॉलम मधे काय लिहायचे? अनेक सर्टिफिकेट असतील तर मॅच्युरिटी डेट च्या कॉलम मधे फक्त एकच तारीख टाकण्याची सोय असल्याने तुम्ही त्या कॉलम मधे तुमच्याकडे असलेल्या अनेक सर्टिफिकेट पैकी सर्वात शेवटी मॅच्युरिटी असलेल्या सर्टिफिकेटवरील तारीख लिहा.

११) ज्या लोकांनी २०१४ मधे पेन्शन प्लान घेतला होता त्याची मॅच्युरिटी डेट २०२४ मधे येईल पण व्याज फक्त ३ महिनेच (किंवा जे असेल ते) मिळाले. त्यानंतर मिळालेच नाही अश्या केस मधे क्लेम कसा करायचा?

या प्रश्नाचे समर्पक उत्तर आपल्याला आता देता येणार नाही. तरी सध्या सर्टिफिकेट मधील आपण जी रक्कम भरलेली आहे ती रक्कम, प्रिन्सिपल अमाऊंट या कॉलम मधे भरायची आहे.

तसेच सर्टिफिकेट मधील पेन्शन प्लान अंतर्गत मिळालेले चेक जर का बाकी असतील किंवा बाऊन्स झालेले असतील अश्या सर्व चेक ची बेरीज करून मुदती अंती मिळणाऱ्या रकमेमधे जोडावी आणि मग त्या दोघांची जी बेरीज येईल ती रक्कम टोटल क्लेम अमाऊंट आणि सरेंडर वॅल्यू या दोन्ही कॉलम मधे सेम भरावी.

मित्रहो, वरील प्रश्नांच्या उत्तराने आपली बरीचशी अडचण दूर होईल याचा विश्वास वाटतो. तेव्हा शांतपणे फॉर्म सबमिट करा.

ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ? खालील video पाहावा  👇👇👇

 

पॅन कार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?

10 डिसेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे.

पॅन कार्ड क्लब क्लेम अर्ज कुठे करावा?

pclcirp.dcirrus.co या वेबसाईट वर अर्ज करावा.

36 thoughts on “पॅन कार्ड क्लब लिमिटेड गुंतवलेले पैसे परत मिळणार लगेच अर्ज करा | Pan Card Club Limited Online Apply”

  • Form save as a draft kelya nntr edit option available nslya karnane Folio no. Ani membership no. Update karta yet nahiye. Form mde print krnya purvi changes karayche astil tr kay karayche. Please guide….

   Reply
 1. Application last date is 23-September-2022 as per Advertisement published in news paper, It’s not 10-December-2022, please correct the date.

  Reply
 2. ekach person kade swatache investment che 2 te 3 pancard membership certificate astil tyani one by one cliam online sumbit karaicha ka jointly form bharu shaktat te kase

  Reply
 3. Had filled form day before yesterday and when was going to upload the documents yesterday it showed fill all mandatory fileds .when I filled the form there was no option of folio number now they are saying to put it but I can’t edit the form so unable to submit form please help

  Reply
 4. allmost khup chhan mahiti dilit Sir, ek query ahe, multiple folio add karayla sangtay mag Value of amount nakki kuthlya folio no.chi taakaychi?

  Reply
 5. After submitting the form
  No successful msg came on screen instead error came up “unexpected problem…”
  What should we do because we can’t resubmit the form… How can we come to know it is submitted properly or not?

  Reply
 6. Sir,
  I have 2 Nos of pan card certificate. First I apply for one certificate and print out also get for the same. But when I apply for second certificate then first certificate information not available in form which print out to also not upload due to complete details of first certificate is not available in form and not option for edit the form. Please help me for fill up first certificate form and another certificate form or any other option.
  Regards

  Suresh Gawas

  Reply
 7. Had filled form in last week and upload the required documents. After uploading all documents there is no submission option available there. There was message to complete the form meanse fill the all form once again. Is it correct to fill the form once again.

  Reply

Leave a Comment

close button