pan card Aadhar Card Link – पॅन – आधार लिंक केले नाही! आता भरावा लागणार दुप्पट दंड पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने केलेल्या वर्ष दीड वर्षापासून मोठी मोहीम राबवली.
pan card Aadhar Card Link
यासाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली. मात्र आता मुदत संपल्यानंतर तुम्हाला पॅन व आधार कार्ड लिंक करायचे असेल तर दुप्पट दंड भरावा लागणार आहे.
कधी किती दंड होता?
30 जून 2022 पर्यंत पॅन-आधार लिंकिंगसाठी 500 रुपये दंड होता, मात्र 1 जुलैपासून तो 1000 रुपये करण्यात आला आहे.
पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे
- सर्वात आधी आयकर विभागाच्या नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec / portal वर जा. पेजवर तळाशी दिलेल्या आधार लिंकवर क्लिक करा.
- तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी क्लिक हेअर’वर क्लिक करा. येथे आधार आणि पॅनचे डिटेल्स द्यावे लागतील.
- जर तुमचे पॅन हे आधार कार्डशी लिंक केलेले असेल तर तशी माहिती तत्काळ तिथेच मिळेल.
- तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला वरील वेबसाइटवर होम पेजवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लिंक आधार वर क्लिक करावे लागेल.
असा भरावा लागेल दंड
- पॅन-आधार लिकिंगसाठी onlineservices.tin.egov-nsdl.com/etoxnew/tdsnontds. jsp Protean या पोर्टलला भेट द्या.
- पॅन-आधार लिंकिंग रिक्वेस्टसाठी CHALLANND. / ITNS 280 वर क्लिक करा.
- Tax Applicable निवडा,
- मायनर हेड 500 (फी) आणि मेजर हेड 0021 (कंपन्यांव्यतिरिक्त इन्कम टॅक्स) अंतर्गत सिंगल चालानमध्ये फी भरणे सुनिश्चित करा
- नेटबँकिंग, डेबिट कार्डद्वारे पेमेंटची पद्धत निवडा.
- पॅन क्रमांक प्रविष्ट करा, असेसमेंट इयर निवडा आणि पत्ता प्रविष्ट करा.
- कॅप्चा प्रविष्ट करा आणि प्रोसीड टॅबवर क्लिक करा.
- पॅन कार्ड आधार कार्ड ला कसे लिंक करायचे हा व्हिडिओ पाहा 👇👇