ONGC महामंडळात अप्रेंटिस पदासाठी मेगा भरती, कोणतीही फी नाही | ONGC Apprentice Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

ONGC Apprentice Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ONGC महामंडळात अप्रेंटिस पदासाठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल 2000+ फ्रेशर्स उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भरती साठी कोणतीही परीक्षा फी नाही, ऑनलाईन अर्ज करायचे आहेत; 20 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, त्यांनी भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखातून जाणून घ्यावी आणि नंतरच फॉर्म भरावा.

ONGC Apprentice Recruitment 2023 in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – ट्रेड पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस

🙋 Total जागा – एकूण 2500 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल त्यांना हे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.

पदवीधर अप्रेंटिस:

  • B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech

ट्रेड अप्रेंटिस:

  • 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/

टेक्निशियन अप्रेंटिस:

  • सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 24 वर्षे

  • SC/ST: 05 वर्षे सूट,
  • OBC: 03 वर्षे सूट

💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही परीक्षा फी नाही

💰वेतन श्रेणी (Salary) – 9000 रु. पदानुसार बदलू शकते.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 सप्टेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा

How to Apply for ONGC Apprentice Recruitment 2023

ONGC Apprentice Bharti साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे.

ऑनलाइन फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती, फॉर्म मध्ये भरायची आहे आणि सुचने नुसार कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

फॉर्म Submit करण्या आगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक चेक करून पहायची आहे. नंतरच अर्ज Submit करायचा आहे.

निवड प्रक्रिया साठी उमेदवाराकडे ईमेल आयडी आणि मोबाईल असणे आवश्यक आहे. यावरच त्यांना पुढील अपडेट दिल्या जाणार आहेत, ईमेल आणि मोबाईल हा किमान 1 वर्ष जुना असणे अनिवार्य आहे.

भरती साठी लेखी अर्ज स्वीकारला जाणार नाही, अर्ज हे ऑनलाईन स्वरूपातच करावे लागणार आहेत.

उमेदवारांची निवड ही Merit च्या आधारे केली जाणार आहे, ज्या उमेदवाराला 10 वी 12 वी मध्ये जास्त गुण असतील त्यांची निवड केली जाणार आहे. आणि जर दोन उमेदवारांना सारखे गुण असतील तर त्यातील ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे त्या उमेदवाराची निवड केली जाईल.

Leave a Comment