अतिवृष्टी नुकसान भरपाई GR आला, या 10 जिल्ह्यांना 1286 कोटी रुपये | Nuksan Bharpai New GR

Nuksan Bharpai New GR – अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्तीप्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

GR DOWNLOAD

Nuksan Bharpai New GR

राज्यात जुलै, 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.10.08.2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-2022/प्र.क्र.253/म-3, दि.22.08.2022 अन्वये जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर, 2022 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एकूण रु. 128675.66 लक्ष (अक्षरी रुपये बारशे श्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लक्ष सहासष्ट हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई GR आला

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे येत्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे निधीची आवश्यक ती तरतुद करुन हा निधी विभागीय आयुक्त यांना कार्यासन -11 यांनी वितरित करावा. विभागीय आयुक्त यांनी खालील अटीची पूर्तता झाल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांना निधी वितरीत करावा.

(अ) चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घेण्याची व तशा स्वरुपाचे प्रमाणपत्र सर्वसंबंधित जिल्हाधिकारी यांचे कडून घेवून त्यानंतरच निधी वितरीत करण्यात यावा.

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

GR DOWNLOAD

 

Leave a Comment

close button