Nuksan Bharpai Maharashtra – जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तो खालीलप्रमाणे आहे.
Nuksan Bharpai Maharashtra
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्तीप्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
राज्यात जुलै, 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.10/08/2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून, शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-2022/प्र.क्र.253/म-3, दि.22/08/2022 अन्वये जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
नुकसान भरपाई
जून ते ऑगस्ट, 2022 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता अनुक्रमे रु. 344525.55 लक्ष व रु. 5645.66 लक्ष असा एकूण रु. 350171.21 लक्ष (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे एक कोटी एकाहत्तर लक्ष एकवीस हजार फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र अ- 1 व प्रपत्र अ-2 मध्ये जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. “Nuksan Bharpai Maharashtra”
कोणत्या जिल्ह्याला किती ? 👇👇👇 येथे क्लिक करून GR DOWNLOAD करा
पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी.
सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. {Nuksan Bharpai Maharashtra}
कोणत्या जिल्ह्याला किती ? 👇👇👇 येथे क्लिक करून GR DOWNLOAD करा
Hii hii
शासनाने प्रत्येक गावात नुकसान भरपाई यादी लावायला हवी. कारण त्या मुळे शेतकऱ्यांना खरोखरच अतिवृष्टी यादीतील नावे योग्य की अयोग्य ते समजतील व त्यात पारदर्शकता येईल. जर ती यादी 7/12 चावडी वर प्रसिद्ध केली तर अती उत्तम.