Nuksan Bharpai List 2022:- माहे मार्च, एप्रिल व मे, २०२२ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात यावे व त्यानुसार त्यांना मदत देण्यात यावी असा निर्णय दिनांक १२ मे, २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
नुकसान भरपाई 2022 मदत जाहीर
त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार बाधित क्षेत्रासाठी मदत देण्याकरीता रू. १२२२६.३० लक्ष निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, कोकण, पुणे, नाशिक, औरंगावाद, अमरावती, नागपूर यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने रूपये १२२२६.३० लक्ष निधीचा प्रस्ताव मंजुरीकरीता मंत्रीमंडळ उपसमितीस चक्राकार पध्दतीने सादर करण्यात आला होता, मंत्रीमंडळ उपसमितीने मंजूरी दिलेली आहे.
माहे मार्च, एप्रिल व मे, २०२२ या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपीकांचे/फळपिकांचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF)/राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण मदत देण्यास प्राप्त झालेल्या शासन मान्यतेनुसार, विभागीय आयुक्त, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यांना शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या विवरपत्रानुसार निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या विवरपत्रानुसार निधी विभागीय आयुक्त, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कक्ष अधिकारी (म-११) यांनी सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करावा.
वाटप करताना खालीलप्रमाणे अटी व शर्तीची पूर्तता करण्यात यावी
Nuksan Bharpai List 2022 Maharashtra: – वरील प्रयोजनासाठी प्रचलित दरानुसार होणारा खर्च रूपये १२२२६.३० लक्ष (रूपये एकशे बावीस कोटी सव्वीस लक्ष तीस हजार फक्त) हा प्रधान लेखाशीर्ष “२२४५-नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर चक्रीवादळ इत्यादी, १०१ अनुग्रह सहाय्य, (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, (९१) (०५) पीक नुकसानीमुळे शेतक-यांना मदत, ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२४५ २४५२)” या लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
- प्रचलित नियमानुसार शेती / बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील.
- प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांना करावे.
- संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी.
- कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत करण्यात येऊ नये.
- पिकांच्या नुकसानीबाबत मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत.
Nuksan Bharpai List 2022

