महिना 5 हजार गुंतवा आणि 36 लाख मिळवा | NPS Yojana in Marathi 2024

By Shubham Pawar

Published on:

NPS Yojana in Marathi – महिना 5 हजार गुंतवा, 36 लाख मिळवा! देशातील वाढती महागाई लक्षात घेता, निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठ्या मासिक उत्पन्नाची आवश्यकता असते. निवृत्तीनंतर स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महिना 5 हजार गुंतवत एकरकमी 36 लाखांसह महिन्याकाठी 50 हजार पेन्शन कशी मिळवावी, हे जाणून घेऊ. (NPS Yojana in Marathi)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPS Yojana in Marathi 2024

  • नॅशनल पेन्शन निवृत्तीसाठी आहे. त्याची परिपक्वता कालावधी 60 वर्षे आहे. केवळ विशेष परिस्थितीत तुम्ही 60 वर्षांच्या अगोदर पैसे काढू शकता.
  • प्रणाली (एनपीएस) खाते उघडून गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यात वयाच्या 60 व्या वर्षी म्हणजेच निवृत्तीनंतर, तुम्हाला एकरकमी रक्कम मिळेल.
  • तुम्हाला पेन्शनच्या रुपात दरमहा चांगले नियमित उत्पन्नही मिळेल. एनपीएस ही सरकारी पेन्शन योजना आहे.

कसे मिळणार ५० हजार रुपये मासिक पेन्शन?

  • गुंतवणूकदार वय – 30 वर्षे
  • गुंतवणूक कालावधी – 30 वर्षे
  • मासिक गुंतवणूक – रु 5,000
  • अंदाजे परतावा – 10%
  • एकूण गुंतवणूक – 18 लाख
  • प्राप्त परतावा – 95 लाख
  • परिपक्वता रक्कम – 1.15 कोटी
  • एकरकमी पैसे – 36 लाख
  • वार्षिकी एन्युटी रक्कम – 76 लाख
  • वार्षिकी दर – 8%
  • मासिक पेन्शन – 50,766

अतिरिक्त कर वाचेल NPS Yojana in Marathi

  • ज्या करदात्यांना अधिक कर वाचवायचा आहे त्यांनी एनपीएसमध्ये गुंतवणूक करावी.
  • एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यावर करदात्यांना वार्षिक 1.5 लाख रुपयांच्याव्यतिरिक्त 50 हजार रुपयांची अधिकची कर सवलत मिळते.
  • गुंतवणूकदार 7 पेन्शन फंडापैकी कोणताही एक निवडू शकतात.

महिना 5 हजार गुंतवा आणि 36 लाख मिळवा

एनपीएसचे फायदे काय?

एनपीएस खात्यात गुंतवणूक करून तुम्ही हे देखील ठरवू शकता की, पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक आधारावर एनपीएसमध्ये पैसे जमा करू शकता.

एनपीएस वयाच्या 60 व्या वर्षी परिपक्च होते, ती 65 वर्षे वयापर्यंत चालू ठेवता येते. एनपीएस इक्विटी, सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बॉइस आणि इतर पर्यायी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करते.

NPS Yojana in Marathi 2024

काय आहेत तोटे?

एनपीएसमधील गुंतवणूक निवृत्तीसाठी आहे. त्याची परिपक्वता कालावधी 60 वर्षे आहे. केवळ विशेष परिस्थितीत तुम्ही 60 वर्षांच्या अगोदर पैसे काढू शकता.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment