आता शेतीच्या पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकरी करू शकणार ई- पंचनामा

now farmers will do e-panchnama

पुणे: राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक पंचनामा वेळेत होतो की नाही यासाठी शेतकरी चिंताक्रांत असतात. पंचनाम्यासाठी आंदोलनेही होतात. त्यावर प्रभावी उपाय आता राज्य शासनाकडून शोधला जात आहे. ई-पंचनामा प्रणाली आणून थेट शेतकऱ्यांनाच पंचनाम्याचे अधिकार देण्यासाठी लवकरच नवे धोरण आणले जाण्याची शक्यता आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सध्या महसूल विभागाच्या सेवांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी वारंवार आढावा घेतला जात आहे. पीक पाहणी करण्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागत होते. मात्र ई-पीक पाहणीचा अधिकार थेट शेतकऱ्यांना देणारा उपक्रम थोरात यांनी नेटाने राबवून दाखविला.

हे देखील वाचा »  महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर | Palakmantri List Of Maharashtra 2022

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या राज्यव्यापी समन्वयातून हा प्रकल्प आता यशस्वी देखील झाला आहे. त्यामुळे पीक पंचनाम्यातही असेच अधिकार शेतकऱ्यांना मिळवून देणारी प्रणाली आणता येईल काय, याची चाचपणी महसूल विभागाची यंत्रणा करीत आहे.

“ई-पीक पाहणी” मुळे आता शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकाचे छायाचित्र घेत असून ऑनलाइन नोंदी शासनाकडे पाठवीत आहेत. या नोंदी बहुतांश ठिकाणी बिनचूक असून त्याची पडताळणी व मान्यता देण्याचे अधिकार तलाठ्यांकडेच आहेत.

आता त्याचा पुढचा टप्पा म्हणून याच ई-पीक पाहणीमधून आलेल्या नोंदीतील पीक जर नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेले असल्याचा त्याची पाहणी ई-पंचनामा प्रणालीतून शेतकऱ्यांना देता येणे शक्य आहे,” अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

हे देखील वाचा »  शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी आली पहा तुमचे नाव, अशी करा डाऊनलोड || या कारणामुळे तुमचे नाव नाही

ई-पंचनामा प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महसूल विभागाकडून भ्रमणध्वनीवर चालणारे स्वतंत्र उपयोजन (ॲप्लिकेशन) तयार केले जाण्याची शक्यता आहे. (Now in case of loss of crops, farmers will be able to do e-panchnama)

थोरात, करीर यांच्याकडून पाठबळ

“सामान्य शेतकऱ्यांना क्लिष्ट नियमावली आणि किचकट
कामकाजापासून दिलासा देणारी कार्यपद्धत राबवा, अशा स्पष्ट सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनीही ऑनलाइन सुधारणांना मोठे पाठबळ मिळवून दिलेले आहे.

हे देखील वाचा »  PM किसान eKYC करण्याची तारीख वाढली, ही आहे शेवटची तारीख | pm kisan kyc last date extended

त्यामुळे भविष्यात ई-पंचनामा प्रणाली राज्यात लागू होण्याची शक्यता वाढली आहे. तसे झाल्यास अशी सुविधा देणारे देशातील पहिले राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होईल,” असे सूत्रांचे म्हणणे आहे.

1 thought on “आता शेतीच्या पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकरी करू शकणार ई- पंचनामा”

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top