नियमित कर्जदार 50,000 अनुदान मिळणार तत्काळ हे काम करा | niyamit karj mafi yojana maharashtra

niyamit karj mafi yojana maharashtra – कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ बचत खात्याशी आधारजोडणी करण्याचे आवाहन. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 2017 18, 2018-19 तसेच 2019-20 या कालावधीत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

niyamit karj mafi yojana maharashtra

लाभाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. बँकेच्या मंजूर धोरणानुसार विहित मोह मुदतीत ज्या शेतकऱ्यांनी या तीन वर्षांत अल्पमुदत पीककर्जाची परतफेड केली आहे.

अशा शेतकऱ्यांना त्यांनी सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीककर्जाची रक्कम 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या मुद्दल रकमेइतका प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे. {niyamit karj mafi yojana maharashtra}

नियमित कर्जदार 50,000 अनुदान मिळणार

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक आहे. आधार कार्ड नाहीत अशा पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे व ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावी.

तसेच, आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नाही त्यांनीही बँकेच्या शाखेत संपर्क साधून आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिलिंद सोबले यांनी केले आहे. “niyamit karj mafi yojana maharashtra”

1 thought on “नियमित कर्जदार 50,000 अनुदान मिळणार तत्काळ हे काम करा | niyamit karj mafi yojana maharashtra”

Leave a Comment

close button