नमो शेतकरी योजना यादी 2023 तुमचे नाव चेक करा | namo shetkari yojana list 2023 maharashtra

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो, आज आपण नमो शेतकरी योजना यादी महाराष्ट्र माहिती बघणार आहोत या योजनेची माहिती अगोदर पाहूयात, नंतर आपण लिस्ट कशी पहायची ते सुद्धा पाहणार आहोत.या योजनेंतर्गत शेतकर्यांना २ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. ह्या योजनेसाठी पंतप्रधाननिधी योजेनेच  हफ्ता ज्यांना मिळतो त्यांना याचा लाभ मिळणार आहे.  मित्रांनो तुम्हाला namo shetkari yojana list 2023 maharashtra यादी पहायची असेल तर टी कशी पहायची ? हे आपण या लेखात पाहणार आहोत.

namo shetkari yojana list 2023 maharashtra

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM- KISAN) योजना सुरु केली असुन सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणा-या निर्देशाप्रमाणे संदर्भ क्र.(१) च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असुन संदर्भ क्र. (२) namo shetkari yojana list 2023 maharashtra च्या शासन निर्णयान्वये सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.

मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्याबाबतची घोषणा केलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दि. ३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना सन 2023-24 पासुन खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता दिली आहे.

नमो शेतकरी योजनेकरीता लाभार्थी पात्रता (Eligibility) व देय लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे

 • सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात.
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
 • तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील.
 • या बदलांकरीता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.
 • पी. एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी (namo shetkari yojana list 2023 maharashtra) होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.
योजनेची कार्यपद्धती:-

पी. एम. किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणा-या पोर्टलवरुन / प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली

 • पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल/प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी. namo shetkari yojana list 2023 maharashtra
 • केंद्र शासनाच्या संमतीने पी. एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण (Integration) करण्यात यावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थीच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.
namo shetkari yojana list
namo shetkari yojana list

 

निधी वितरणाची कार्यपध्दती

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या PM- KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरीत करण्यात येईल.

योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान झाल्यास करावयाची वसुली

सदर योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर लाभ धारकाकडून करावयाची वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येवून आयुक्त (कृषि) यांच्या मार्फत शासनाकडे जमा करण्यात यावी

नमो शेतकरी यादी कशी पाहावी ? namo shetkari yojana list 2023 maharashtra

 • सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या वेबसाईट – https://pmkisan.gov.in/ वरती जावं ला गेल.
 • वेबसाईट वरती गेल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर फार्मर कॉर्नर मध्ये तुम्हाला beneficiary list ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
 • आपले महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तुमचा तालुका सिलेक्ट करा तुमचा ब्लॉक सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करा namo shetkari yojana list 2023 maharashtra
 • आता तुम्हाला Get Report वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांचे नाव दिसतील
 • समोर आलेले सर्व शेतकरी हे नमो शेतकरी निधी योजनेच्या यादीमध्ये असणार आहेत
 • याचा अर्थ असा होतो की पी एम किसान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तेच नमो किसान सन्मान निधी योजनेत राहणार आहेत
 • तुम्हाला कोणतीही पुन्हा नोंदणी वगैरे करावी लागणार नाही पीएम किसान चा हप्ता मिळत असेल तर नमोचा सुद्धा हप्ता तुम्हाला भेटेल

Conclusion

मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही नमो शेतकरी योजनेची लिस्ट कशी पहायची या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे की – नमो ची यादी (namo shetkari yojana list 2023 maharashtra ) कशी पहायची व लाभ कसा मिळवतो इ . मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही ही पोस्ट इतर मित्रांना शेअर कराल. धन्यवाद !

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

1 thought on “नमो शेतकरी योजना यादी 2023 तुमचे नाव चेक करा | namo shetkari yojana list 2023 maharashtra”

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!