मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू GR आला | MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023

By Shubham Pawar

Published on:

MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA :- नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्थात मुख्यमंत्री सोलर पंप योजना ही नव्याने सुरू झालेली आहे त्या संदर्भातला आज नवीन GR आला आहे तरी या जीआर मध्ये नक्की काय माहिती सांगितलेली आहे? हे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत तरी संपूर्ण पोस्ट वाचा आणि आपल्या मित्रांना ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत दोन लाख सोलर पंप देण्यात येणार आहेत पण आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA) नव्याने सुरू झाल्यामुळे आता कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत एक लाख सोलर पंप आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत 1 लाख सौर पंप देण्यात येणार आहे म्हणजेच दोन्ही योजनेअंतर्गत 1-1 लाख सौर पंप म्हणजेच सोलर पंप हे देण्यात येणार आहेत त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण जीआर आज घेण्यात आलेला आहे.

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज 

MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA

राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानार्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान (कुसुम) देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाची अमलबजावणी केंद्र शासनाने दिनांक २२ जुलै, २०१९ अन्वये प्रसिध्द केलेल्या व वेळोवेळी दिलेल्या महाभियानाच्या मार्गदर्शक सुचनानुसार करण्यास व त्याची उद्दिष्टे, कार्यपध्दती, अमलबजावणी, निधीची तरतूद, आर्थिक अनुदान तसेच राज्यात सदर अभियान स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत राबविण्यास दिनांक १२ मे, २०२१ च्या शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

सदर कुसुम महाभियानाच्या पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्याबाबतच्या घटक ब (Componant B) अंतर्गत ऑगस्ट, २०२२ अखेर केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला एकूण २,००,००० पारेषण विरहीत सौर पप मंजूर करण्यात आले आहेत. सदर २,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपपापैकी १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपपाची अमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.  “MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA” आता उर्वरित केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंपाची अमलबजावणी स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबीत कृषि पंप विद्युत जोडण्याच्या पुर्ततेसाठी (Paid Pending) करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

👇👇👇👇

शासन निर्णय (GR DOWNLOAD) येथे पहा 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना शासन निर्णय

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम) अंतर्गत पारेषण विरहीत सौर कृषीपप आस्थापित करण्याबाबतच्या घटक व (Componant B) अंतर्गत ऑगस्ट, २०२२ अखेर महाराष्ट्राला मंजूर करण्यात आलेल्या एकूण २,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपपापैकी केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप स्टेट नोडल एजन्सी (“MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA” महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबीत कृषि पप विद्युत जोडण्याच्या पुर्ततेसाठी (Paid Pending) आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१) केंद्र शासनाच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाकडून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्धारित केलेले निकष तसेच या योजनेचा मुळ शासन निर्णय क्र. उद्योग उर्जा व कामगार विभाग क्र. सौरप्र- २०१२/प्र.क्र.२६८/ऊर्जा-७, दिनांक १२.०५.२०२१ मधील उर्वरित सर्व तरतूदी जशाच्या तशा लागू राहतील आणि योजनेची अमलबजावणी करताना महावितरण आणि महाऊर्जा यानी सर्व निकषांचे ततोतंत पालन करावे. MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA

२) राज्यात सदर योजनेच्या अमलबजावणीसाठी स्टेट नोडल एजन्सीव्दारे (महाऊर्जामार्फत) पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. स्टेट नोडल एजन्सीव्दारे तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलचा वापर करण्यासाठी सदर पोर्टलमध्ये समातर अमलबजावणी यंत्रणा म्हणून महावितरणचा समावेश करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची कार्यवाही महाऊर्जाच्या मदतीने महावितरणने करावी व त्यासाठी येणारा खर्च महावितरणने करावा.

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू

(३) कुसुम घटक “ब” अंतर्गत जिल्हानिहाय सौर कृषि पपांची संख्या निर्धारित करताना शहरी लोकसंख्या वगळता ग्रामिण लोकसंख्येच्या समप्रमाणात सौर कृषि पपांची संख्या निर्धारित करावी. ही सर्व कार्यवाही करण्यासाठी महाऊर्जा योजनेच्या समन्वयासाठीची भूमिका पार पाडेल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सौर कृषि पंपाची मागणी विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात न्यायोचीत प्रमाणात पप आस्थापित होतील याबाबतची खबरदारी घ्यावी. सदर योजनेतून पेंड पेंडीग यादीमधील लाभार्थ्यांना पंप वितरीत करण्यात येणार असल्याने एखाद्या जिल्ह्यात सौर कृषि पंपाची मागणी कमी असल्यास सदर जिल्ह्यातील अधिकचे सौर पंप मागणी असणाऱ्या जिल्ह्यात सुकाणू समितीच्या मान्यतेने वळती करावेत.

४) सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर लाभार्थ्याला त्याची विक्री करता येणार नाही, MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA अशी विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्या लाभार्थ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा व गुन्हा सिध्द झाल्यास सदर लाभार्थी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार नाही. या शर्तीची अंमलबजावणी सुद्धा क्रमशः महाऊर्जा आणि महावितरण कंपनीची राहील.

तर मित्रांनो अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज घेण्यात आलेला आहे हा शासन निर्णय तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या वेबसाईटवरून तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वरून सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता धन्यवाद.

👇👇👇👇

शासन निर्णय (GR DOWNLOAD) येथे पहा 

 

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज 

👇👇👇👇

 

केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला एकूण किती पारेषण विरहीत सौर पप मंजूर करण्यात आले आहेत?

केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला एकूण २,००,००० पारेषण विरहीत सौर पप मंजूर करण्यात आले आहेत

२,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपपापैकी किती पारेषण विरहीत सौर कृषीपपाची अमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे?

२,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपपापैकी १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपपाची अमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

6 thoughts on “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू GR आला | MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023”

  1. नंदुरबार जिल्हा केव्हा सारुन होणार आहे वेबसाईट सुरू झाली की sms करा

    Reply

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!