शेतकऱ्यांना दर वर्षी मिळणार 12,000 रू. | Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2022

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2022 – राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेतून गरीब शेतकऱ्यांना वर्षाला अनुदान दिले जाणार आहे.

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेच्या धर्तीवरच राज्याची ही योजना असणार आहे. प्रतिवर्षी सहा हजार रुपये इतके अनुदान या योजनेखाली मिळणार आहे. “Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2022”

मात्र टप्प्याटप्प्याने या रकमेचे वाटप होणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी नेमका किती खर्च येणार ? आणि अर्थसंकल्पात किती तरतूद केली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतर राज्याला शेतकरी आत्महत्यामुक्त बनविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता.

राज्य शासन लवकरच शेतकऱ्यांसाठी काही आर्थिक घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. त्यापाठोपाठ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर नव्या सरकारने शिक्कामोर्तब केले होते.

येथे क्लिक करा »  (रजिस्ट्रेशन) विधवा पेंशेन योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज | Application Form 2022

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना

योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
कोणी सुरु केली महाराष्ट्र सरकार ने
लाभार्थी महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी (५ एकर च्या आतमधील)
उद्देश ₹6000 चे आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/
वर्ष 2022

Mukhyamantri Kisan Yojana

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे- फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षांकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2022

मागच्या तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाणार आहे.

येथे क्लिक करा »  अटल पेन्शन योजना संपूर्ण माहिती | Atal Pension Yojana in Marathi

मुख्यमंत्री किसान योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये

  • मुख्यमंत्री किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची रक्कम ₹6000 असेल. आणि केंद्र सरकारची रक्कम ₹6000 चालूच राहील.
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सर्व लाभार्थी या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • मुख्यमंत्री किसान योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
  • (CM Kisan Yojana) मुख्यमंत्री किसान योजनेंतर्गत मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

महत्वाची कागदपत्रे

  • पीएम किसान योजना नोंदणी क्रमांक
  • आधार कार्ड
  • पत्ता पुरावा
  • शिधापत्रिका

शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शिंदे सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे.

येथे क्लिक करा »  ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 3 हजार 501 कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द केले आहेत. जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये, बागायत पिकांसाठी 27 हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 36 हजारांची मदत सरकारकडून करण्यात आली आहे. (Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2022)

तीन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून नागरिकांना हा आर्थिक दिलासा देण्यात येणार आहे.

शेतकर्यांना किती रक्कम मिळणार आहे?

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकर्यांना केंद्र शासनाचे 6000 रु. व आता महाराष्ट्र सरकारचे 6000 रु. असे १२ हजार रु. मिळणार आहेत.

कोणते शेतकरी पात्र असतील?

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत फक्त अल्पभूधारक शेतकरी पात्र असतील.

1 thought on “शेतकऱ्यांना दर वर्षी मिळणार 12,000 रू. | Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra 2022”

Leave a Comment

Your email address will not be published.

close button
Scroll to Top