MUCBF Recruitment 2023: मित्रांनो तुम्ही जर लिपिक पदासाठी तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लिपिक पदासाठी भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकतात. एकूण 19 रिक्त जागा आहेत, केवळ नाशिक जिल्ह्यासाठी ही भरती मर्यादित आहे.
ज्या उमेदवारांना Typing चांगल्या प्रकारे जमते त्यांच्या साठी नोकरीची सुवर्णसंधी आहे, अर्ज हे केवळ 1 नोव्हेंबर 2023 पर्यंतच स्वीकारले जाणार आहेत. त्या नंतर मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
भरती संबधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
MUCBF Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post) – लिपिक
🙋 Total जागा – एकूण 19 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
उमेदवार हा पदवीधर असावा, त्याने MSCIT केलेली असावी. तसेच Typing Course Marathi/English पूर्ण झालेला असावा. (Typing Speed द्वारे निवड होणार आहे)
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नाशिक (महाराष्ट्र)
👉 वयोमर्यादा (Age Limit) – 22 ते 25 वर्षे
💵 अर्ज शुल्क (Fees) – ₹944/- (राखीव वर्गाला कोणतीही सूट नाही)
💰वेतन श्रेणी (Salary) – ₹25,130/-
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 01 नोव्हेंबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | Download PDF |
MUCBF Recruitment 2023 Apply Online
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, लिपिक पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे, कोणत्याही इतर माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी!
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे, त्याची Official Website Link दिलेली आहे.
फॉर्म भरताना उमेदवारांना आवश्यक अशी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. कोणतीही चूक आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे.
फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, वेबसाईट वर ज्या सूचना दिल्या आहेत त्या नुसार फॉर्म भरून घ्यायचा आहे; आणि कागदपत्रे योग्य Size आणि Ratio मध्ये अपलोड करायचे आहेत.
भरती साठी शेवटी परीक्षा फी भरायची आहे, फी सर्व उमेदवारांना सारखीच असणार आहे. राखीव वर्गाला सूट नाहीये.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तो Recheck करून घ्यायचा आहे, एखादी चूक असल्यास ती लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे.
उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, सोबत मुलाखत देखील घेतली जाणार आहे. जे उमेदवार या मध्ये चांगली कामगिरी करतील, त्यांची लिपिक पदासाठी निवड केली जाईल.
अधिक माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे, जाहिरात वाचून ही संपूर्ण माहिती उमेदवार मिळवू शकतात. Notification Download PDF Link दिलेली आहे. (टेबल मध्ये Download PDF वर क्लिक करून जाहिरात पाहा)