महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती, नोकरीची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा | MPSC Technical Education Services Recruitment 2023

By Shubham Pawar

Published on:

MPSC Technical Education Services Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी तयारी करत होते, त्यांच्या साठी ही एक सुवर्णसंधी आहे. MPSC मार्फत Technical Education Services अंतर्गत भरती सुरू झाली आहे. या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती साठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म हा ऑनलाइन माध्यमातून MPSC कडे सादर करायचा आहे. एकूण 378 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, यामध्ये एकूण 4 पदे आहेत त्यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक, अधिव्याख्याता असे पदे समाविष्ट आहेत.

उमेदवारांना दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदती नंतर मात्र अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे उमेदवारांना त्यांचा अर्ज लवकर भरून घ्यायचा आहे.

या लेखामध्ये भरतीची सविस्तर माहिती दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. सोबतच तुम्हाला अधिकृत जाहिरात देखील वाचता येणार आहे, त्याची पण Direct Download Link येथे दिली आहे.

MPSC Technical Education Services Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नावपद संख्या
प्राध्यापक32
सहयोगी प्राध्यापक46
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक214
अधिव्याख्याता86
Total378

🙋 Total जागा – एकूण 378 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पदा नुसार पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे; त्या पदा साठीचे पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार निकष पूर्ण करत नसेल तर तो भरती साठी पात्र ठरवला जाणार नाही.

पद क्र.1:

  • Ph.D.
  • SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने.
  • 10 वर्षे अनुभव

पद क्र.2:

  • Ph.D.
  • 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी .
  • SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने.
  • 08 वर्षे अनुभव

पद क्र.3:

  • 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी
  • NET/SET

पद क्र.4:

  • संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी
  • B.Ed.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट ही पदा नुसार वेगवेगळी आहे, कृपया जाहिरात पाहा.

💵 अर्ज शुल्क (Fees) –

  • पद क्र.1,& 2: इतर प्रवर्ग: ₹719/-  [राखीव प्रवर्ग: ₹449/-]
  • पद क्र.3 & 4: इतर प्रवर्ग: ₹394/-  [राखीव प्रवर्ग: ₹294/-]

💰वेतन श्रेणी (Salary) – पदा नुसार वेतन श्रेणी वेगवेगळी आहे, कृपया जाहिरात पाहा.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 09 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now

🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) –

पद क्र. 1:Download PDF
पद क्र. 2:Download PDF
पद क्र. 3:Download PDF
पद क्र. 4:Download PDF

MPSC Technical Education Services Recruitment 2023 Apply online

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत भरती सुरू झाली आहे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म ऑनलाइन माध्यमातून भरायचा आहे.

उमेदवार हा अर्ज MPSC च्या अधिकृत वेबसाईट वरून सादर करू शकणार आहेत. Official Website Link ही वर टेबल मध्ये दिली आहे, कृपया Apply Now वर क्लिक करून काळजीपूर्वक फॉर्म भरा.

ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, तसेच कोणतीही चूक करायची नाही, नंतर edit करण्यासाठी Option दिला जात नाही, त्यामुळे सबमिट करण्यापूर्वीच काळजी घ्या.

फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, त्यांचे Size आणि Ratio हा योग्य असावा, जर नसेल तर फॉर्म मध्ये कागदपत्रे अपलोड होण्यास अडचण येईल.

उमेदवारांना फॉर्म बरोबर परीक्षा फी देखील भरायची आहे, जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजेच Last Date ही 09 नोव्हेंबर 2023 आहे, या तारखे पर्यंतच फॉर्म भरणे सुरू असणार आहे. नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

पदा नुसार जाहिरात ही वेगवेगळी आहे, तसेच पात्रता निकष देखील वेगवेगळे आहेत. परंतु अर्ज हा एकाच ठिकाणाहून करायचा आहे, उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्या संबंधित माहिती त्यांना असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी उमेदवार अधिकृत जाहिरात वाचू शकतात, किंवा येथे कमेंट देखील करू शकतात. आम्हाला थेट संपर्क साधण्यासाठी तुम्ही आमचे अधिकृत Telegram Group जॉईन करू शकता.

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!