MPSC बद्दल माहिती | MPSC Information in marathi 2022

MPSC Information in marathi 2022 – आज महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत व देत आहेत.

काही नवीन विद्यार्थ्यांच्या मनात अनेक वेळा प्रश्न पडतो mpsc म्हणजे काय ? या लेखात आपण एमपीएससी विषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत.

MPSC Information in marathi
MPSC Information in marathi

एमपीएससी चा इतिहास काय आहे पार्श्वभूमी ?

ज्यावेळी भारताची राज्यघटना तयार करण्यात आली त्यावेळी प्रत्येक राज्य व त्यांच्या सेवेमध्ये प्रशासकीय अधिकारी व कामगार वर्गाची निवड करण्यासाठी लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरा नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगामार्फत महाराष्ट्रात उपजिल्हाधिकारी, डि वाइ एसपी तहसीलदार, नायब तहसीलदार, इत्यादी पदांची भरती केली जाते.

एमपीएससी कोणतीही परीक्षा नसून हा एक आयोग आहे ज्याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि स्थानिक राजकारणापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्नही केला आहे.

लोकसेवा आयोग अध्यक्ष आणि इतर काही सदस्यांचा बनलेला असतो. जे वेगवेगळ्या क्षेत्रात आलेली असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे.

त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग दिल्ली येथे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जिल्हाधिकारी, आयपीएस, इंडियन फोरेन सर्विस, इंडियन फोरेस्त सर्विस इत्यादी पदे भरली जातात. MPSC Information in marathi 2022

कोणत्या पदांसाठी घेते एमपीएससी परीक्षा ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा, कम्बाईन ग्रुप बी, कम्बाईन ग्रुप सी, वन सेवा , अभियांत्रिकी अशा वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. यातील काही एक टप्प्यामध्ये तर काही दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये विभाजित केलेल्या परीक्षा आहेत.

साधारणता एमपीएससीमार्फत तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेतली जाते ते पुढील प्रमाणे

१) चाळणी परीक्षा

२) मुख्य परीक्षा

३) मुलाखत

चाळणी परीक्षा ही विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी घेतली जाते म्हणजेच एका पदासाठी त्या पदाला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली जाते. आज पर्यंत चालत आलेल्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थी हे एका पदासाठी दहा ते पंधरा निवडले जातात. ज्यामुळे मुख्य परीक्षेवर जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचा ताण पडत नाही. त्यानंतर मुलाखत किंवा काही विशिष्ट पदांसाठी शारीरिक चाचणी घेतली जाते. ‘MPSC Information in marathi 2022′

कशी असते परीक्षा पद्धती व प्रोसेस ?

MPSC Information in marathi
MPSC Information in marathi

प्रथमता आयोग हा प्रत्येक वर्षी आपल्या पुढील वर्षी निघणाऱ्या जाहिरातींचे वेळापत्रक तयार करत असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा सरकारकडून आलेल्या मागणी पत्राच्या आधारे जाहिराती प्रसिद्ध करत असते.

यामध्ये आरक्षण इत्यादी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असतो. लोकसेवा आयोग हा फक्त राज्य सरकारला गरज असलेल्या पदांसाठी परीक्षा घेते.

एमपीएससी परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून वित्त पुरवठा केला जातो. “MPSC Information in marathi 2022”

प्रत्येक पदांसाठी मार्फत किंवा काही शारीरिक मानके ठरविण्यात आली आहे. जसे की पीएसआय डीवायएसपी कोणताही दिव्यांग परीक्षार्थी अर्ज करू शकत नाही.

का वाढत आहे एमपीएससीच्या परीक्षांकडे मुलांचा ओघ ?

आजच्या वेळेला बेरोजगारी मुळे प्रत्येक विद्यार्थी हा आर्थिक रित्या व सामाजिक स्थैर्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आहे.खाजगी क्षेत्र मधील कमी झालेल्या नोकऱ्यांचे प्रमाण आर्थिक मोबदला यामुळे विद्यार्थी हे सरकारी नोकरी असावी या दृष्टीने एमपीएससीकडे वळत आहेत.

 

हेही वाचा - कशाप्रकारे एका वर्षात पास होऊ शकतो एमपीएससी परीक्षा ?

Leave a Comment

close button