MJPSKY CSC PORTAL LOGIN Portal login We are Providing the process of MJPSKY Portal CSC and Mahatma Joytiba Phule Karj Mafi Yojana KYC Login process |Mahatma Jotirao Phule Karj Mukti Yojana Login Process.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना मधील यादी महाराष्ट्र कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कर्ज माफी यादी अंतर्गत अर्ज करणारे शेतकरी आपल्या जिल्ह्यानुसार त्यांची नावे जाणून घेऊ शकतात. महाराष्ट्र कर्ज माफी योजना शासनाच्या MJPSKY | Porata संकेतस्थळावरच भरली आहे. कर्जमाफी यादी महाराष्ट्र २०२० च्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांची नावे Online जाहीर करण्यात आली आहेत आणि ते आपले सरकार सेवा केंद्र(CSC Center) किवा नजीकच्या तलाठी किवा तहसीलदार कार्यालामध्ये आणि बँक मध्ये यादी लावण्यात आल्या आहेत.
How to Login MJPSKY CSC PORTAL LOGIN
MJPSKY CSC PORTAL LOGIN |
- स्टेप 1:-(CSC चालकाने) आपले सरकार सेवा केंद्राने पोर्टल वर लोगिन करण्याकरीता DIDITAL SEVA या लिंक वर जावे.
- स्टेप 2:- CSC यूजर आयडी व पासवर्ड टाकून आपण साइन इन करून घ्यावे.
- स्टेप 3:- त्यानंतर नवीन आगमन झलेल्या लिंक तुम्ही उजव्या बाजूला पुढे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता त्या लिंक View Product या बटण वर क्लिक करा.
![]() |
MJPSKY CSC portal login |
- स्टेप 4:- CSC चालकाला विशिष्ट क्रमांक किवां आधार क्रमांक द्वारे शेतकरी कर्ज खात्याच्या आधार KYC साठी खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहू शकता असे दोन ऑप्शन दिसतील.
![]() |
mjpsky CSC login portal login Process |
- स्टेप 5:- CSC चालकाने शेतकऱ्याने दिलेल्या विशिष्ट क्रमांक किवा आधार क्रमांक समाविष्ट करून सर्च बटनावर क्लिक करावे.
![]() |
Mjpsky CSC portal login |
- स्टेप 6:- आधार क्रमांक चुकीचा असल्यास कृपया वैध आधार क्रमांक प्रविष्ट करा.
MJPSKY Portal CSC Login
- स्टेप 7:- आधार क्रमांकाशी संबंधीत कर्ज खात्याचा सर्व डेटा यादी मध्ये विशिष्ट क्रमांक, कर्ज धारकांचे नाव, बँकेचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव, कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, बचत खाते क्रमांक यांसारखा संपूर्ण डेटा दिसेल.
![]() |
mjpsky csc portal login Process |
- स्टेप 8:- शेतकर्याने दिलेला आधार क्रमांक व दाखिवलेल्या कर्जाची माहिती बरोबर असल्यास मान्य बटणावर क्लिक करा नंतर रक्कम मान्य असल्यास मान्य बटनावर क्लिक करा आणि ओके करा.
![]() |
mjpsky CSC kyc portal |
CSC LOGIN MJPSKY
- स्टेप 9:- कर्ज खात्याच्या दिलेल्या माहिती मधील थकीत रक्कम मान्य आहे का या टॅब च्या खाली Yes दर्शवले जाईल.
- स्टेप 10:- सेल्फ डिक्लेरेशन चेकबॉक्स वर क्लिक केल्यानंतर आधार प्रमाणीकरण प्रकार निवड हे टॅब दिसतील.
![]() |
mjpsky csc kyc | portal login Process |
- स्टेप 11:- CSC चालकाने खालील प्रमाणे शेतकर्यांचे आधार KYC करू शकता
![]() |
MJPSKY CSC login portalpdf |
१) आधार लिंक मोबाइल द्वारे OTP(One Time Password)
२) बायोमेट्रिक च्या साह्याने
३) आधार KYC शक्य नसल्यांस शक्य नाही वर क्लिक करून त्यांचे सुधा ‘MJPSKY CSC LOGIN’ चालकाने आधार द्वारे OTP किवा बायोमेट्रिक च्या साह्याने करू शकता.
- स्टेप 12:- ओटीपी प्राप्त झाल्यावर OTP करा किवा बायोमेट्रिक द्वारे MJPSKY CSC KYC करावी सगळी प्रोसेस झाल्यावर KYC यशस्वी रित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दर्शविला जाईल.
![]() |
CSC mjpsky portal login |
- स्टेप 13:- CSC चालकाने शेतकऱ्यांना आधार MJPSKY KYC ची नोदं देण्या करीत प्रिंट या बटनावर क्लिक करून नोदं पावती दयावी.
![]() |
MJPSKY CSC portal login pdf download |
MJPSKY CSC LOGIN PROCESS PDF ASSK VIDEO
MJPSKY CSC PORTAL LOGIN IMPORTANT TIPS
आपले सरकार सेवा केंद्र /सामुहिक सुविधा केंद्रचालक यांचेसाठी मार्गदर्शक सुचना
1. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी त्यांना पुरविलेल्या प्रशिक्षण साहित्याची इतंभूत माहिती घ्यावी.
2. आपले सरकार सेवा केंद्र यांना पोर्टलशी जोडण्यासाठी लॉगीन आयडी देण्यात येईल. केंद्र चालक आधार प्रमाणीकरणासाठी अंतिम झालेली यादी डाऊनलोड करुन छापून घेतील, व आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची यादी गांव निहाय त्यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करतील.
3. ज्या वेळेस शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रावर भेट देतील त्या वेळेस केंद्र चालकाने शेतकऱ्यांना खालील प्रमाणे माहिती द्यावी :
अ. प्रमाणीकरण करण्यासाठी करावयाची कार्यवाहीबाबत माहिती देणे.
ब. पोर्टलवर शेतकरी कर्जखात्याच्या तपशिलाचे स्क्रीनवर दिसणारे मान्य / अमान्य पर्यायांबाबतचा अर्थ शेतकऱ्यांना समजावून सांगणे- शेतकऱ्याने आपली संमती देण्यापूर्वी आपला आधार क्रमांक व कर्जखात्यांचा तपशिल तपासून घेणे गरजेचे आहे.
i. ज्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यास आधार क्रमांक किंवा कर्जखात्याचा तपशिल मान्य असेल, अशी प्रकरणे लाभाच्या निधीचे हस्तांतरणासाठी थेट पोर्टलवर पाठविण्यात येतील.
ii. ज्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यास आधार क्रमांक व कर्जखात्याचा तपशिल अमान्य असेल, अशा प्रकरणामध्ये पोर्टलद्वारे तक्राराची नोंद होऊन ती थेट जिल्हा स्तरीय तक्रार निवरण समितीकडे पाठविली जातील.
क. शेतकऱ्यास आवश्यक असल्यास त्याचा मोबाईल क्रमांक अद्यावत करता येईल याबाबतची माहिती देणे.
4. शेतकऱ्याने आपले सरकार सेवा केंद्र /सामुहिक सुविधा केंद्र/बँकेचे शाखेत जात असताना स्वत:चे आधार कार्ड, यादीमधील विशिष्ट क्रमांक, बचत खाते पुस्तक व मोबाईल सोबत घेवून जाणे आवश्यक असेल.
5. शेतकऱ्याने आपले आाधार कार्ड व विशिष्ट क्रमांक केंद्र चालकास द्यावे.
6. केंद्रचालक प्रथमत: शेतकऱ्यांनी दिलेल्या आधार कार्डचा नंबर टाकून पोर्टलवरुन शेतकऱ्याच्या कर्जखात्याबाबतचा तपशील उघडतील.
7. जर आधार क्रमांकाच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या कर्ज खात्याचा तपशील पोर्टलवर उघडत नसेल तर केंद्र चालकाने विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने कर्ज खात्याचा तपशील पोर्टलवर उघडण्याचा प्रयत्न करावा.
8. केंद्र चालकास प्रत्येक कर्ज खात्यासमोर मान्य/अमान्य बाबतचा पर्याय (Button) दिसेल.
9. याशिवाय आधार क्रमांकाच्या समोर देखिल मान्य/ अमान्य बाबतचा पर्याय (Button) दिसेल.
10. केंद्र चालक शेतकऱ्यास दर्शविण्यात आलेला आधार क्रमांक व कर्ज खात्याचा तपशिल मान्य असल्याबाबत विचारणा करेल-
अ. शेतकऱ्यास सर्व माहिती मान्य असल्यास , उदा. आधार क्रमांक व कर्ज खात्यांची रक्कम-
i. केंद्र चालक आधार क्रमांकासमोर व कर्ज खात्याच्या रकमेसमोर दर्शविण्यात आलेल्या मान्य पर्यायाची निवड (Click) करतील.
ii. केंद्र चालक शेतकऱ्यांच्या ठशांद्वारे/ओटीपी (OTP) द्वारे प्रमाणीकरण करुन घेतील.
iii. प्रमाणीकरण झाल्यानंतर अशा कर्जखात्याची माहिती निधी हस्तांतरणासाठी पोर्टलवर आपोआप पाठविली जाईल.
ब. शेतकऱ्यास आधार क्रमांक अमान्य असल्यास –
i. अशा प्रकरणी केंद्र चालकांनी –
•आधार कार्डवर असलेले शेतकऱ्याचे नाव व स्क्रिनवर दर्शविण्यात आलेले शेतकऱ्याचे नाव तपासावे. दोन्ही नावांमध्ये साम्यता असावी. काही प्रकरणामध्ये नावामध्ये किरकोळ फरक असण्याची शक्यता आहे.
उदा.
1) आधार कार्डवरील नाव – वल्लभ जगताप
स्क्रिनवर वरील नाव – वल्लभ विलास जगताप
नोंद करणे – मान्य करावे
2) आधार कार्डवरील नाव – अजित पाटील
स्क्रिनवर वरील नाव – अजितराव पाटील
नोंद करणे – मान्य करावे
3) आधार कार्डवरील नाव – बाळ यादव
स्क्रिनवर वरील नाव – बाळासाहेब यादव पाटील
नोंद करणे – मान्य करावे
4) आधार कार्डवरील नाव – तरुण धोटे
स्क्रिनवर वरील नाव – राहूल धोटे
नोंद करणे – अमान्य करावे
• बचत खाते पुस्तिकेमधील बचत खाते क्रमांक व स्क्रिनवर दर्शविण्यात आलेला बचत खाते क्रमांक तपासून बघावे. हे दोन्ही क्रमांक समान असणे आवश्यक आहे.
• जर शेतकऱ्याचे अनेक बँकांमध्ये बचत खाते असल्यास असे सर्व बचत खाते क्रमांक व स्क्रिनवर दर्शविण्यात आलेले असे सर्व बचत खाते क्रमांक समान असणे आवश्यक आहे.
ii. जर शेतकऱ्याने दिलेल्या आधार कार्ड व बचत खाते पुस्तिकेमधील नमुद त्याचे नाव आणि बचत खाते क्रमांक, स्क्रिनवर दर्शविण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या नावाशी आणि बचत खाते क्रमांकाशी जुळत नसेल तर अशी खात्री झाल्यानंतर केंद्र चालकाने आधार क्रमांकासमोर नमुद असलेल्या अमान्य पर्यायाची निवड (Click) करावी.
iii.अशा प्रकरणामध्ये केंद्र चालकाने शेतकऱ्याच्या आधार कार्डाच्या सहाय्याने शेतकऱ्याचा अचूक आधार क्रमांकाची नोंद करावी.
iv.अशा अचूक आधार क्रमांकाची नोंद झाल्यानंतर केंद्रचालकाने शेतकऱ्यांच्या ठशांद्वारे/ओटीपी (OTP) द्वारे प्रमाणिकरण करुन घ्यावे.
v. याबाबत केंद्र चालकाने तक्राराची नोंद झाल्याबाबत व अशी तक्रार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पाठविली असल्याबाबत शेतकऱ्यास सांगावे व तक्रारबाबतची संगणकीय छापील प्रत शेतकऱ्यास द्यावी.
क. शेतकऱ्यास पोर्टलवरील त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेली कर्ज खात्याची रक्कम अमान्य असल्यास-
i. केंद्र चालकाने स्क्रिनवर दर्शविण्यात आलेल्या कर्जखात्याशी संबंधित असलेली कर्जखात्याच्या रक्कमेसमोर दर्शविण्यात आलेल्या अमान्य पर्यायावर नोंद (Click) करावी.
ii. तद्नंतर शेतकऱ्याचे ठशांद्वारे/ओटीपी (OTP) द्वारे आधार प्रमाणीकरण करावे.
11. आधार प्रमाणीकरण तसेच प्रमाणीकरण अयशस्वी झालेल्या प्रकरणामध्ये करावयाची कार्यवाही-
अ. ठशांद्वारे प्रमाणीकरण :
i. केंद्र चालकाने प्रथमत: शेतकऱ्यांच्या ठश्यांद्वारे प्रमाणीकरण करुन घ्यावे. यासाठी शेतकऱ्याने प्रथम स्वत:च्या अंगठयाच्या ठश्यांद्वारे प्रमाणीकरण करुण घ्यावे.
ii.जर शेतकऱ्याच्या अंगठयांच्या ठश्यांद्वारे प्रमाणीकरण होत नसेल, तर केंद्रचालकाने शेतकऱ्याच्या इतर बोटांच्या ठश्यांद्वारे प्रमाणीकरण करुन घ्यावे.
iii. जर केंद्रचालकास शेतकऱ्याच्या बोटांच्या ठश्यांद्वारे प्रमाणीकरण करता येत नसेल तर केंद्र चालकाने अशा शेतकऱ्यांचे ओटीपी (OTP) द्वारे प्रमाणीकरण करुन घ्यावे.
ब. ओटीपी (OTP) द्वारे प्रमाणीकरण-
i. शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाबरोबर जोडणी केलेल्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठविला जाईल.
ii. केंद्र चालक शेतकऱ्याकडून वरील ओटीपी (OTP) क्रमांक घेवून पोर्टलमध्ये अपलोड करेल व शेतकऱ्याचे प्रमाणीकरण करेल.
क. प्रमाणीकरण अयशस्वी-
i. जर बायोमॅट्रीक पद्धतीने किंवा ओटीपी (OTP) पद्धतीने प्रमाणिकरण होवू शकत नसेल असे केंद्र चालक “प्रमाणीकरण होवू शकत नाही” हे बटण दाबेल. बटन दावल्यानंतर चालक स्वत:च्या बोटांचे ठसे देऊन पोर्टलवर या संदर्भात तक्रार निमार्ण करण्याची प्रक्रीया पूर्ण करेल.
ii. अशा परिस्थितीत प्रमाणीकरण होवू शकत नसल्याबद्दलची तक्रार पोर्टलद्वारे निर्मित होवून जिल्हा तक्रार निवारण समितीकडे निर्णयासाठी वर्ग होईल.
iii. केंद्र चालक शेतकऱ्याला तक्रार निर्माण झाली व ती जिल्हास्तरीय तक्रार समितीकडे वर्ग झाली आहे याबाबत शेतकऱ्यांना माहिती देईल व तक्रारीबाबतची पोर्टलद्वारे निर्मित छापील पावती शेतकऱ्यांना देईल.
iv.केंद्र चालक तक्रार निवारणासंदर्भात शेतकऱ्यांना त्यांच्याकडील आवश्यक कागदपत्रांच्या नकलांसह तहसील कार्यालयामध्ये समक्ष पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबद्दल मार्गदर्शन करतील.
v. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनूसार तहसीलदार संबंधित शेतकऱ्यांनी दाखल केलेले आधार नंबर संबंधातील कागदपत्रांची पडताळणी करतील व पोर्टलवर प्रमाणीकरणाची सद्यस्थिती अद्यावत करतील. तहसीदार यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर व प्रमाणीकरणाची स्थिती अद्यावत केल्यानंतर सदर कर्ज खात्यांची माहिती निधी वितरणासाठी पाठविण्यात येईल.
बँकांनी वेगवेगळ्या वेळी माहिती अपलोड केल्यामुळे सुरवातीच्या काळात संपूर्ण कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध न झाल्यास अशी माहिती ज्या ज्या वेळेला उपलब्ध होईल त्या त्या वेळी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी केंद्रावर यावे लागेल.
- मयत लाभार्थ्यांचे वारसदार निश्चित करून आधार अमान्य करावे व वारसदारचा आधार क्रमांक जोडुन वारसदार यांचे आधार प्रमाणीकरण करावे .
- लाभार्थ्यांचे कर्ज खाते / बचत खाते क्रमांक चुकीचे असतील तर ,अमान्य करून तक्रार दाखल करून, खाते क्रमांक दुरुस्त करून घ्यावें.
धन्यवाद🙏🙏
मित्रांनो, तुम्हाला MJPSKY CSC LOGIN Process बद्दल किवा MJPSKY लिस्ट २०२० पाहण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
AMACHI ADHAR PRAMANIKARAN PROCESS CHUKICHI ZALELI AHE .DILELI RAKKAM AMHALA MANYA AHE.PN AMHALA TI SAMJLA NASLYAMULE TI NAHI HE OPTION AMHI KEL AHE TYAMULE TAKRAR ZALELI PRINT MIDALI AHE.PLZ APAN KRUPAYA SANGA ATA KAY KARAYCHE.BANK VALE PN SANGAT NAHI AHE
aapn tahasildar office mdhe jaun ha problem nkki solve hoil
Sir
Issue about when we enter the adhar.no or vishisth no. Then it displays the message’ No Data Found’. What will I do please solve my problem.
.my contact number..
becoz you not in list of pmjsky list
माझी सध्या ची परिस्थिती खूप वाइट आहे मला कर्ज माफी झालेली नाही मला तुमची कर्ज माफी होणार नाही कर्ज भरा आसे बँकेतून फोन येतात मला मुद्रा लोन घेण्या साठी बँक ने i t.r file tyar Kara aase सागितले पण लोन मिळाले नाही v karj maf pan zale nahi Kay Karu