म्हाडा भरती: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील सरळसेवा भरती – 2021
म्हाडा सरळसेवा भरती 2021 करीता दि.12.12.2021 ते दि.20.12.2021 या दरम्यान चार टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. तथापि, दि.११.१२.२०२१ रोजी भरती प्रक्रिया राबविण्याकरीता नियुक्त केलेल्या कंपनीचे संचालक यांना सायबर पोलीस, पुणे यांनी म्हाडा सरळसेवा भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले व अटक केली.
MHADA Bharti Exam time table 2021
या घटनेमुळे सुयोग्य, गुणवंत व पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरीता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने दि.१२.१२.२०२१ ते दि२०.१२.२०२१ दरम्यान चार टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा तात्काळ रद्द केली. सदर परीक्षा आता दि.01.02.2022 ते दि.15.02.2022 या दरम्यान होणार आहे.
दि.01.02.2022 ते दि.15.02.2022 दरम्यान होणारी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेचे तपशिलवार वेळापत्रक व अन्य सूचना लवकरच म्हाडाच्या प्रसिध्द करण्यात येतील.